IMPIMP

Diabetes | हाता-पायांची सूज सुद्धा आहे अनियंत्रित मधुमेहाचा इशारा, ‘या’ 10 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

by nagesh
Diabetes | early warning signs and symptoms of disease

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Diabetes | मधुमेह आजार आता सामान्य झाला आहे. या आजारापासून वाचण्यासाठी त्याचे संकेत ओळखणे आवश्यक आहे. याची लक्षणे सामान्य ते गंभीर असू शकतात. टाईप-1 डायबिटीजमध्ये लक्षणे ताबडतोब दिसू लागतात. तर टाईप-2 डायबिटीजची (Diabetes) लक्षणे खुप उशीरा दिसून येतात. टाईप-2 च्या तुलनेत टाईप-1 डायबिटीज जास्त गंभीर मानला जातो. या आजाराची काही लक्षणे जाणून घेवूयात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

1. हाता-पयांना सूज, अस्पष्ट दिसणे –

शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने अनेकदा हातापयांना सूज येते. डोळ्यात सूज येऊन अस्पष्ट दिसू लागते. अशावेळी डॉक्टरांकडे जा.

2. भूक आणि थकवा –

डायबिटीजच्या (Diabetes) रूग्णांना खुप लवकर भूक थकवा येतो. अशी लक्षणे दिसल्यास ताबतोब तपासणी करून घ्या.

3. वारंवार लघवी आणि तहान लागणे –

ब्लड शुगर वाढल्याने किडनी योग्यप्रकारे काम करत नाही आणि रूग्णाला वारंवार लघवीला जावे लागते. यामुळे सतत तहान लागते.

4. तोंड कोरडे पडणे आणि खाज सुटणे –

डायबिटीजच्या (Diabetes) रूग्णाचे तोंड लवकर कोरडे पडते आणि त्वचेला खाज सुटते वारंवार लघवी केल्याने शरीरात द्रव पदार्थाची कमतरता होते यामुळे तोंड सुकते, त्वचेला खाज सुटते.

5. इन्फेक्शन होणे –

डायबिटीजच्या काही रूग्णांमध्ये स्किन इन्फेक्शन सुद्धा होते. जखम भरण्यास सुद्धा उशीर लागतो. कधी-कधी पायांमध्ये वेदना होतात.

6. वजन कमी होणे –

डायबिटीजच्या रूग्णांना खाण्यातून उर्जा मिळत नाही, ज्यामुळे त्यांचे वजन वेगाने कमी होऊ लागते.

 

Web Title: Diabetes | early warning signs and symptoms of disease

 

हे देखील वाचा :

Babasaheb Purandare | ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन

WhatsApp New Features | व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेटमध्ये लवकरच येतील 8 नवीन फिचर्स, वापर करणे होईल आणखी सोपे; जाणून घ्या

Gadchiroli | गडचिरोलीमध्ये पोलिस अन् नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक ! मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’, 4 पोलिस जखमी

 

Related Posts