IMPIMP

Bharat Ratna Award-LK Advani | भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ जाहीर

by sachinsitapure
Bharat Ratna Lal Krishna Advani

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bharat Ratna Award-LK Advani | भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याबाबत ‘एक्स’ (ट्विटर) वर माहिती दिली आहे. तसेच लालकृष्ण आडवाणी यांचे फोन करुन अभिनंदन केले आहे. प्रभू श्रीराम मंदिराच्या आंदोलनातील सर्वात प्रमुख चेहरा म्हणून त्यांची एल.के. अडवाणी यांची ओळख आहे. (Bharat Ratna Award-LK Advani)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठितराजकारण्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी भारताच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिले आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून त्यांनी देशसेवा करण्यापर्यंत त्याचे समर्पण महत्वाचे आहे. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. संसदेतील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे.

https://x.com/narendramodi/status/1753660421809066495?s=20

काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. राष्ट्रपती भवनातून याबाबत निवेदन जारी करण्यात आले होते. कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीआधी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Related Posts