IMPIMP

Aurangabad Crime | धक्कादायक ! वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून 40 वर्षीय तलाठ्याची आत्महत्या; सुसाईड करण्यापुर्वी लिहिली चिठ्ठी

by nagesh
Wardha Crime | girlfriend leaves boyfriend commits suicide after getting out of jail at wardha

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन  Aurangabad Crime | औरंगाबाद जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. वरिष्टांच्या जाचाला कंटाळून एका तलाठ्याने (Talathi) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना रविवारी (28 नोव्हेंबर) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण बोराटे (Laxman Borate) (वय 41, रा. सातारा गाव) असं आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. बोराटे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील आरोपांची चौकशी करण्यात येईल, असं सातारा पोलीस ठाण्याचे (Satara Police Station) पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे (PI Surendra Malale) यांनी सांगितलं.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, लक्ष्मण बोराटे (Laxman Borate) हे औरंगाबादमध्ये महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत होते.
बोराटे यांनी शनिवारी रात्री उशिरा छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला होता.
रविवारी सकाळी बोराटे लवकर न उठल्यामुळे त्यांच्या आईने बोराटे यांच्या आतेभावाला त्यांना उठविण्यासाठी पाठविले होते.
त्यावेळी लक्ष्मण बोराटे यांच्या खोलीचा दरवाजा आतून लाँक होता. यानंतर बोराटे यांच्या आईने आणि नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, सातारा पोलिस (Satara Police) घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बोराटे यांच्या घराचा दरवाजा तोडला असता, बोराटे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
पोलिसांनी तत्काळ त्यांना फासावरून खाली उतरवून शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
तर, लक्ष्मण बोराटे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं नातेवाईकांनी म्हटंल होतं.
अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यावर नातेवाईकांनी सायंकाळी उशिरा बोराटे यांचा मृतदेह ताब्यात घेवून अंत्यविधी केला. (Aurangabad Crime)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात (Satara Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Aurangabad Crime | talathi commits suicide due to harassment of senior officer

 

हे देखील वाचा :

Mallaika Arora-Arjun Kapoor | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरमध्ये वाद, नववर्षाच्या स्वागताला देखील सोबत नसणार

Pune Crime | भरधाव वाहनाच्या धडकेत मंचर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

 

Related Posts