IMPIMP

Pune Crime | भरधाव वाहनाच्या धडकेत मंचर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू

by nagesh
 Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck

पुणे / मंचर : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | दुचाकीला अज्ञात वाहनाने (unknown vehicle) पाठिमागून जोरदार धडक दिल्याने (two wheeler hit) दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू (couple died) झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) मंचर येथे घडली आहे. हा अपघात मंचर घोडेगाव रोडवरील (Manchar Ghodegaon Road) वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीत आज (सोमवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला. एकनाथ बबनराव नाईक (वय-47) व संगीता एकनाथ नाईक (वय-42 दोघे रा. नारोडी) असे अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मंचर पोलिसांनी (Manchar police) दिलेल्या माहितीनुसार, कोशिंबेग गावच्या हद्दीतील भीमाशंकर हॉस्पिटलसमोर (Bhimashankar Hospital) हा अपघात झाला.
यामध्ये नाईक दाम्पत्याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. मुळचे नारोडी येथील रहीवासी असलेले नाईक दाम्पत्य कामानिमित्त चाकण (Chakan) येथे राहतात.
एकनाथ हे माथाडीमध्ये काम करतात. रविवार सुट्टी असल्याने ते गावी आले होते.
आज सकाळी साडेअकराच्या सुमारास मंचर घोडेगाव रस्त्याने ते पत्नीला घेऊन दुचाकी (एमएच 14 डी क्यू 5604) वरुन मंचर बाजूने घोडेगावच्या दिशेने चालले होते.

 

त्यावेळी पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाची धडक त्यांच्या दुचाकीला बसली.
यामध्ये गंभीर जखमी (Seriously injured) झालेल्या नाईक दाम्पत्याला उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात (Manchar Sub-District Hospital) नेण्यात आले.
त्यांच्यावर उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला.
यासंदर्भात सावता दत्तात्रय नाईक यांनी मंचर पोलीस ठाण्यात (Manchar police station) तक्रार दिली आहे.
अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pune Crime | two wheeler hit unknown vehicle couple manchar died spot pune district

 

हे देखील वाचा :

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

Modi Government | ‘हा’ बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार देतंय 2.50 लाख रुपये; पहिल्याच दिवसापासून होईल मोठी कमाई, जाणून घ्या कशी

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम.जी. एन्टप्रायजेसच्या डिंपल सोमजीला सशर्त जामीन

 

Related Posts