IMPIMP

धनंजय मुंडेंनी सांगितली राजाची गोष्ट, म्हणाले – ‘देव करतो ते भल्यासाठीच करतो…’

by sikandershaikh
Dhananjay Munde | ncp leader dhananjay munde on cm eknath shinde in vidhansabha

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) हे आपल्या खास शैलीत भाषण करण्यात तरबेज आहेत. आपल्या भाषणातून जुन्या गोष्टी सांगून उपस्थितांची मने जिंकण्यात ते चांगलेच पारंगत आहे. काल बीडच्या परळीमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत त्यांनी एका राजाची गोष्ट सांगून एका दगडात दोन पक्षी मारले. रेणू शर्मा आणि करुणा शर्मा या दोघी बहिणींमुळे मागील काही दिवस ते अडचणीत सापडले होते. यावेळी त्यांनी त्यांच्यावर ओढावलेल्या प्रसंगाचे अप्रत्यक्ष वर्ण गोष्टीतून केले. याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. धनंजय मुंडे यांनी केलेल्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

धनंजय मुंडेंनी सांगितलेली गोष्ट

कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी सांगितले की, माझ्या आजीने मला ही गोष्ट सांगितली होती. एक राजा असतो. दरबारामध्ये तलवार पुसत असताना त्या राजाचा अंगठा तुटतो. ते बघताच प्रधान म्हणतो, राजे, देव करतो ते भल्यासाठी. त्यावेळी राजाला राग आला आणि त्याने प्रधानाला काळ्या कोठडीची शिक्षा दिली. काही दिवसांनी राजा शिकारीला जातो. दाट जंगलात गेल्यानंतर राजा सोबत आलेली फौज मागे राहते. जंगलात असलेले आदिमानव राजाला पकडतात. नरबळी देण्यासाठी राजाला नेण्यात आले. पण एका वृद्धाला राज्याच्या हाताला अंगठा नसल्याचे दिसते. तो म्हणतो याला अंगठा नाही त्यामुळे याचा नरबळी दिला जाऊ शकत नाही. राजाला सोडून दिले जाते. राजा परत येतो आणि प्रधानाची सुटका करतो. प्रधान राजाला म्हणाला, जे होतं ते भल्यासाठी होतं. जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं, तर तुमच्यासोबत मी असताना आदिमानवांनी माझा बळी दिला असता, म्हणून सांगतो संजय भाऊ देव करतो ते भल्यासाठीच करतो.

रेणू-करुणा शर्मा प्रकरणात मनस्ताप

धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी सांगितलेली ही गोष्ट थेट रेणू शर्मा आणि करुणा शर्मा प्रकरणाशी जोडली जात आहे.
रेणू शर्माने अगोदर धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार केली. काही दिवसांनी ती मागे घेतली.
यानंतर तिची बहिण करुणा शर्माने त्यांच्या विरोधात तक्रार केली. यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्याची मागणी केली.
या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन आपली बाजू मांडली. त्यानंतर त्यांना मोठा पाठिंबा मिळू लागला.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी धनंजय मुंडे यांना प्रचंड मनस्ताप झाल्याचे सांगितले होते.

Related Posts