IMPIMP

Anil Deshmukh | CBI चं पथक अनिल देशमुखांच्या घरी दाखल, मुलगा सलील देशमुखला अटक होण्याची शक्यता

by nagesh
Anil Deshmukh | cbi team with arrest warrant of salil deshmukh reached anil deshmukh nagpur home

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन  राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील घरी सीबीआयचे पथक दाखल आहे. सीबीआयचे (CBI) पथक अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मुलगा सलील देशमुख (Salil Deshmukh) यांचा अटक वॉरंट (Arrest warrant) घेऊन आले असल्याची माहिती नागपूरमधील काही सूत्र सांगत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दरम्यान, देशमुख यांच्या घराबाहेर सध्या कोणतीही हालचाल नसल्याची माहिती समोर येत आहे.
नेहमी प्रमाणे दार बंद असून बाहेर नागपूर पोलिसांचा (Nagpur Police) नेहमी प्रमाणे पोलीस बंदोबस्त तैनात आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत
आहे.

CBI चे 5 ते 6 अधिकारी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरी पोहोचले आहेत.
आज (सोमवार) सकाळी 7 वाजता सीबीआयचं पथक देशमुख यांच्या घरी दाखल झालं. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून देशमुख ते कुठे आहेत याची कोणालाही माहिती नाही.

 

कोट्यावधीची संपत्ती जप्त

दोन महिन्यापूर्वी अनिल देशमुख यांची कोट्यावधीची संपत्ती ईडीने (ED) जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering case) ईडीने ही कारवाई केली होती. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे अनिल देशमुख यांना हा मोठा झटका आहे. ईडीने देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये आहे.

 

Web Title : Anil Deshmukh | cbi team with arrest warrant of salil deshmukh reached anil deshmukh nagpur home

 

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | खळबळजनक ! प्राध्यपकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापल्या, विचित्र खूनाच्या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरला

Poonch Terrorist Attack | जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक ! JCO सह 5 भारतीय जवान शहीद

RIL | ‘रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड’ कडून ‘आरईसी सोलर होल्डिंग्स’ 771 दशलक्ष डॉलर मध्ये खरेदी

 

Related Posts