IMPIMP

Aurangabad Crime | खळबळजनक ! प्राध्यपकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापल्या, विचित्र खूनाच्या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरला

by nagesh
Aurangabad Crime | aurangabad professor dr rajan shinde murder case revealed juvenile accused detained

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन औरंगाबाद शहरात (Aurangabad Crime) एका प्राध्यापकाच्या (Professor) विचित्र खूनाच्या (Murder) घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची राहत्या घरात गळा चिरून आणि हाताच्या नसा कापून (cut veins) निर्घृण हत्या केल्याची खळबळजन घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील (Aurangabad Crime) सिडको एन 2 भागात उघडकीस आली आहे. डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (Dr. Rajan Haribhau Shinde) असे खून झालेल्या प्राध्यपकाचं नाव आहे. मागील 12 तासामध्ये खूनची ही दुसरी घटना असून या घटनांमुळे शहर हादरुन गेलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्राध्यापक डॉ. शिंदे हे औरंगाबाद शहरातील (Aurangabad Crime) मौलाना आझाद महाविद्यालयात (Maulana Azad College) इंग्रजी विषय शिकवतात. आज (सोमवार) पहाटे त्यांचे कुटुंबीय झोपेतून उठले असता, प्राध्यापक शिंदे हे घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांची पाया खालची जमनीनच सरकरली. यानंतर या घटनेची माहिती सिडको पोलीस ठाण्यात (CIDCO police station) देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
महत्त्वाचे म्हणजे घरातील केणतीही किमती वस्तू चोरीला गेलेली नाही.
त्यामुळे ही हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली,
याचा तपास सिडको पोलीस करीत आहेत. मारेकऱ्याने मृत प्राध्यापकाचा गळा चिरुन त्यांच्या हाताच्या नसा कापल्या आहेत.
रात्रभर झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा (Aurangabad Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Aurangabad Crime | professors Dr. Rajan Haribhau Shinde murder by slit throat and cut veins in aurangabad

 

हे देखील वाचा :

Poonch Terrorist Attack | जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक ! JCO सह 5 भारतीय जवान शहीद

RIL | ‘रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड’ कडून ‘आरईसी सोलर होल्डिंग्स’ 771 दशलक्ष डॉलर मध्ये खरेदी

Children Psychiatric Problems | मुले ऑनलाइन स्क्रीनवर 4 तासापर्यंत घालवत असतील वेळ तर व्हा सतर्क, मोबाइल आणि लॅपटॉपचे व्यसन बनवतेय मानसिक रुग्ण

 

Related Posts