IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुण्याच्या औंध जिल्हा रुग्णालयातील सिव्हील सर्जनसह प्रशासकीय अधिकारी, सहायक अधीक्षक लाच घेताना पुणे एसीबीच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनAnti Corruption Bureau (ACB) Pune | सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे (Sonography Center Certificate) नूतनीकरण परवाना देण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालयातील (Aundh District Hospital) जिल्हा शल्य चिकित्सक (District Surgeon), प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer), सहायक अधीक्षक (Assistant Superintendent) यांना 12 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

 

जिल्हा रुग्णालय औध येथील प्रशासकीय अधिकारी महादेव बाजीराव गिरी (Mahadev Bajirao Giri), जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधव बापूराव कनकवळे (Dr. Madhav Bapurao Kanakavale), सहायक अधीक्षक संजय सिताराम कडाळे (Sanjay Sitaram Kadale) असे लाच घेणाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तक्रारदार यांचे शिक्रापूर (Shikrapur) येथे सोनोग्राफी सेंटर आहे. या सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना (Renewal License) देण्यासाठी सहायक अधीक्षक संजय कडाळे यांनी प्रशासकीय अधिकारी महादेव गिरी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधव कनकवळे यांच्यासाठी 40 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीमध्ये 12 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी (Pune ACB) कडे तक्रार केली.

 

तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची पंचासमक्ष बुधवारी (दि. 6) पडताळणी केली.
पडताळणीमध्ये डॉ. माधव कणकवळे, महादेव गिरी यांनी संगनमत करुन संजय कडाळे याच्या मार्फत 40 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून 12 हजार रुपये लाच घेताना संजय कडाळे याला पुणे एसीबीने रंगेहात पकडले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा अडनाईक (Deputy Superintendent of Police Seema Adnaik),
पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर (Police Inspector Pravin Nimbalkar),
पोलीस हवालदार नवनाथ वाळके, अंकुश माने, चालक पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग माळी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Pune Aundh District Hospital Civil Surgeon Administrative Officer Assistant Superintendent caught taking bribe in Pune ACB

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार गणराज उर्फ अण्णा ठाकर एक वर्षासाठी स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 72 जणांवर कारवाई

CM Eknath Shinde | शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप लांबणार ? भाजप पक्षश्रेष्ठींचा प्लॅन काय ?; जाणून घ्या

Nawab Malik | मलिकांच्या जामीन अर्जावर 15 जुलैपर्यंत उत्तर देण्याचे ED ला निर्देश

 

Related Posts