IMPIMP

Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणत तरुणाला मारहाण, एकाला अटक

by sachinsitapure

पिंपरी : – Pimpri Chinchwad Crime News | वाढदिवस साजरा करायचा नाही असे म्हणत तीघांनी एका तरुणाला बेदम मारहाण करुन डोक्यात विट मारुन जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) तिघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.25) रात्री साडे अकराच्या सुमारास मुळशी तालुक्यातील बावधान येथील जॅक्सन बार समोर घडला आहे.

याबाबत अनुराग आनंद झा (वय-25 रा. जगन्नाथ धम सोसायटी, बावधान, ता मुळशी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश विठ्ठल माणे (वय-30 राय डि पॅलेश हॉटेल जवळ, बावधान, ता मुळशी) याच्यासह इतर दोन साथीदारांवर आयपीसी 326, 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करुन गणेश माणे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुराग झा याचा मित्र तेजस झा फिर्यादीच्या वाढदिवसानिमित्त केक घेऊन आला होता. यावेळी आरोपी गणेश माने हा जॅक्शन बार समोर असलेल्या टपरी जवळ त्याच्या इतर दोन साथीदारांसह थांबला होता. गणेश याने शिवीगाळ करत इथे वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणत तेजस याला हाताने मारहाण केली. तसेच डोक्यात वीट घालून जखमी केले. अनुराग त्याला सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी त्यालाही मारहाण केली. अनुराग याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गणेश माणे याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ करीत आहेत.

Kidnapping-Rape Case Pune | पुणे : अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् बलात्कार, दोघांना अटक

Related Posts