IMPIMP

Pune Railway Station Crime | पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 7 महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण, घटना CCTV मध्ये कैद (Video)

by sachinsitapure

पुणे :  – Pune Railway Station Crime | पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सात महिन्याच्या बालकाचे अपहरण (Kidnapping Case) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अपहरणकर्ता सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रवण अजय तेलंग (वय-7 महिने रा. मराठवाडा) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत अजय तेलंग यांनी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंग दाम्पत्य मूळचे भुसावळचे आहेत. सासूला भेटण्यासाठी ते आणि त्याची पत्नी पुण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्री पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात तेलंगे दाम्पत्य झोपले होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने तेलंग यांचा सात महिन्यांचा मुलगा श्रावण याला उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली. तेव्हा श्रावण जागेवर नसल्याचे आढळून आले. तेलंग दाम्पत्याने मुलाचा शोध घेतला मात्र, तो सापडला नाही.

त्यानंतर घाबरलेल्या तेलंग दाम्पत्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. तातडीने स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. चित्रीकरणात सात महिन्याच्या बाळाला अपहरण करणारी व्यक्ती दिसत आहे.

बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. स्टेशन परिसरातील रिक्षाचालक, उपहारगृहचालक, फेरीवाल्यांकडे चौकशी करण्यात आली. अपहरण झालेल्या बालकाची माहिती मिळाल्यास त्वरीत सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे (मोबाइल क्रमांक- 9422427847), पोलीस ज्ञानेश्वर गायकवाड (मोबाइल क्रमांक- 9011270505), ज्ञाना बडे (मोबाइल क्रमांक – 9665063033) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणत तरुणाला मारहाण, एकाला अटक

Related Posts