IMPIMP

Rupali Chakankar On Supriya Sule | रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला, घरात आणखी कोणी लहान सहान व्यक्ती राहिली असेल तर तीही प्रचारात उतरवा

by sachinsitapure

पुणे : Rupali Chakankar On Supriya Sule | घरात आणखी कोणी लहान सहान व्यक्ती राहिली असेल तर तीही प्रचारात उतरवा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. काल रेवती सुळे (Revati Sule) प्रचारफेरीत सहभागी झाल्यानंतर चाकणकर यांनी ही टीका केली आहे. त्या भाजप शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Baramati Lok Sabha)

रुपाली चाकणकर म्हणाल्या, खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार (Sansadratna Award) मिळाला. मात्र त्या संसदरत्न पुरस्कारातच रमल्या आहेत. त्यांनी जर सर्वसामान्य लोकांची कामे गेल्या १५ वर्षात केली असती तर त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब उतरवण्याची वेळ आली नसती.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी काल बारामती मतदारसंघात त्यांची कन्या रेवती सुळे, अजित पवार यांचे सख्खे पुतणे आणि सुप्रिया सुळेंचे भाचे युगेंद्र पवार हे प्रचार फेरीत सहभागी झाले होते. यावेळी रेवती सुळेंनी सर्वांचेच लक्षवेधून घेतले. माध्यमांनी देखील त्यांच्या उपस्थितीची दखल घेतली. यावरून चाकणकर यांनी आज ही टीका केली.

सध्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारादरम्यान त्या सातत्याने चर्चेत आहेत. एकुणच त्या बारामतीमध्ये ताकदीने निवडणुकीच्या रणांगणात लढत आहेत.

Pune Crime News | पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पत्रकारात हाणामारी, पत्रकारावर FIR

Related Posts