IMPIMP

Aquila Restaurant | साडीला Smart Dress न मानणारे रेस्टॉरंट ‘Aquila’ला लागलं कुलूप, ‘या’ कारणामुळे झाली कारवाई

by nagesh
Aquila Restaurant | restaurant that did not allow entry to a woman wearing sari is closed due to lack of license

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाAquila Restaurant | साडीला स्मार्ट ड्रेस न मानणारे दक्षिण दिल्लीतील रेस्टॉरंट ‘अकीला’ (Aquila Restaurant) ला आता टाळा लागला आहे. हे रेस्टॉरंट मान्यताप्राप्त लायसन्स शिवाय सुरू होते. प्रशासनाने अगोदर नोटीस जारी केली होती, यानंतर ही कारवाई करण्यात आली. ‘अकीला’च्या स्टाफने मागील आठवड्यात साडी परिधान करून आलेल्या महिलेला प्रवेश देण्यास नकार दिला होता. साडी स्मार्ट ड्रेस नाही असे त्यांचे म्हणणे होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

दक्षिण दिल्ली महापालिकेचे (SDMC) महापौर मुकेश सूर्यन यांनी कारवाईला दुजोरा देत म्हटले की, ‘अकीला’ रेस्टॉरंट सध्या बंद करण्यात आले आहे.
हे रेस्टॉरंट (Aquila Restaurant) वैध लायसन्सशिवाय सुरू होते. त्यांना आम्ही बंद करण्याची नोटीस दिली होती. आता ते बंद झाले आहे.
मंजुरीशिवाय ते सुरू होते. तसेच, आम्ही महापालिका कायद्यांतर्गत दंड लावण्याच्या तरतुदीसह इतर कारवाईची शक्यता सुद्धा तपासत आहोत.

SDMC च्या अधिकार्‍यांनी बुधवारी म्हटले की, एंड्रूज गंजच्या अन्सल प्लाझामधील हे रेस्टॉरंट बंद करण्याची नोटीस 24 सप्टेंबरला जारी केली होती.
यामध्ये म्हटले होते की, प्रभागातील सार्वजनिक आरोग्य निरीक्षकाला 21 सप्टेंबरच्या तपासणीत आढळले की,
रेस्टॉरंट आरोग्य व्यापार लायसन्सशिवाय अस्वच्छ स्थितीत सुरू होते.
इतकेच नव्हे तर, रेस्टॉरंटने सार्वजनिक जागेवर सुद्धा अवैश प्रकारे कब्जा केला आहे.

 

मागील आठवड्यात अकीला रेस्टॉरंटमध्ये एका महिलेला साडी परिधान केली असल्याने प्रवेश नाकारण्यात आला होता.
यावेळी झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. व्हिडिओत एक कर्मचारी हे सांगताना दिसत आहे की साडी स्मार्ट ड्रेस नाही.

तर, रेस्टॉरंटचे म्हणणे आहे की, या महिलेने त्यांच्या स्टाफसोबत भांडण केले. कारण त्यांना प्रतिक्षा करण्यास सांगितले होते.
रेस्टॉरंटने म्हटले की, स्थिती सांभाळण्यासाठी मॅनेजरने त्यांना साडीविषयी आक्षेप असल्याचे सांगितले, जेणेकरून महिलेने निघून जावे.

 

Web Title : Aquila Restaurant | restaurant that did not allow entry to a woman wearing sari is closed due to lack of license

 

हे देखील वाचा :

Khadakwasla Irrigation Department | खडकवासाला पाटबंधारे विभागाचा कारभार तुटपुंज्या मनुष्यबळावर; 50 टक्के पदे रिक्त

Udayanraje Bhosale | आता नगरपालिका निवडणुकीत उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंना एकाचवेळी परभूत करण्याची राष्ट्रवादीची ‘रणनिती’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts