IMPIMP

FIR on Police Inspector | पोलिसाची सटकली ! पान द्यायला झाला उशीर, रिक्षाचालकाला बेदम मारहाण, पोलीस निरीक्षकासह तिघांवर FIR

by nagesh
Pune Crime | after breakup karan anil rajput doing wrong things with girl family, hadapsar police arrrest him

उस्मानाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन FIR on Police Inspector | उस्मानाबाद पोलीस (osmanabad) दलातील एका पोलिसाने एका रिक्षाचालकाला शुल्लक कारणावरून बेदम मारहाण (brutally beaten auto rickshaw driver) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रिक्षाचालकाला मारहाण करणाऱ्या मुजोर पोलीस निरीक्षकासह (FIR on Police Inspector) दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात (Anandnagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून या प्रकरणी मंगळवारी (दि.24) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक फरीद इस्माईल शेख (रा. विकास नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

फरीद शेख हे लातूर रस्त्यावरील पानटपरी जवळ थांबले होते. त्यावेळी आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण (Police Inspector Satish Chavan), पोलीस कर्मचारी मुक्रम पठाण त्याठिकाणी आले. पठाण यांनी फरीदला पान खाऊ घाल असे सांगितले. मात्र, पानवाल्याकडून पान आणण्यास उशीर झाल्याने पठाण याने अर्वाच्य भाषा वापरण्यास सुरुवात केली. फरीदने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पठाण याने त्यालाही शिवीगाळ केली व पोलीस वाहनात बसवले. पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक चव्हाण, पठाण व अन्य एकाने फरीदला लाथाबुक्यांनी मारहाण केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

हा प्रकार सुरु असताना फरीदचा भाऊ त्या ठिकाणी आला आणि त्याने घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला.
यानंतर फरीदला पोलिसांनी सोडून दिले.
या प्रकरणी फरीदने फिर्याद दिली परंतु पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिला.
फरीदने याची तक्रार उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन (Superintendent of Police Rajtilak Roshan) यांच्याकडे करुन दाद मागितली.
तिलक यांनी कारवाईची सूचना दिल्यानंतर जखमी फरीदचा जबाब नोंदवण्यात आला.
या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण,
मुक्राम पठाण व अन्य एका पोलीस कर्मचाऱ्यावर मारहाण, शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title : FIR on Police Inspector | police men brutally beaten autrikshaw driver in osmanabad

 

हे देखील वाचा :

Tax Benefits on Home Loan | फायद्याची गोष्ट ! होम लोनवर कशाप्रकारचे मिळतात TAX बेनिफिट्स, जाणून घ्या सविस्तर

Anti Corruption | 2 लाख 20 हजाराची लाच घेताना शाखा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Nitin Landge Bribe Case | …म्हणून न्यायालयाने पिंपरी मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगेंचा जामीन फेटाळला, येरवडा कारागृहात रवानगी

 

Related Posts