IMPIMP

Hadapsar Pune Crime News | पुणे : तरुणीला अश्लील शिवागाळ करुन मारहाण, आरोपीला अटक

by sachinsitapure

पुणे :  – Hadapsar Pune Crime News | तरुणीचा हात पकडून अश्लील वर्तन (Obscene Behavior) करणाऱ्या तरुणाला विरोध केला असता त्याने शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना मांजरी बुद्रुक (Manjari Budruk) परिसरात सोमवारी (दि.20) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) एका 22 वर्षीय तरुणावर विनयभंग (Molestation Case) व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत 19 वर्षीय पिडीत मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिडीतेच्या तक्रारीवरुन अनिकेत बाळासाहेब मोझे Aniket Balasaheb Moze (वय-22 रा. घुले नगर, मांजरी ब्रु.) याच्यावर आयपीयी 354, 354(अ), 323, 509, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी घुले नगर (Ghule Nagar Hadapsar) परिसरातून जात असताना आरोपीने तिचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिचा हात पकडला. मुलीने त्याला विरोध केला असता आरोपीने तिला अश्लील शिवागाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन

हडपसर : अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिला अभ्यासिका रुममध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 18 मे रोजी हडपसर येथील अभ्यासिकेत घडली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या 35 वर्षीय आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर आयपीसी 354, 354(अ), पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलाने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून फिर्यादी यांच्या मालकीच्या अभ्यासिका येथील खोलीत घेऊन गेला. त्याठिकीणी तिच्यासोबत जवळीक साधून अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

Related Posts