IMPIMP

Jalgaon Crime | नीती आयोगाच्या बनावट कागदपत्राचा वापर; आर्थिक गुन्हे शाखेकडून मुख्य सुत्रधाराला अटक

by nagesh
 Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Jalgaon Crime | नीती आयोगाच्या नकली कागदपत्राचा वापर करुन प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याच्या नावाने प्रिंपाळा (Prinpala) येथील राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या 180 केंद्र चालकांना 94 लाख 14 हजार 853 रुपयाची फसवणुक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी साखळीतील मुख्य सुत्रधार अविनाश ऊर्फ अर्जुन कळमळकर (रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास याला ताब्यात घेतले असुन त्याच्यावर अशाच प्रकारची फसवणुक केल्याचे गुन्हे (Jalgaon Crime) दाखल करण्यात आले आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अधिक माहितीनुसार, पिंप्राळा येथील योगिता उमेश मालवी (Yogita Umesh Malvi) यांनी
दिलेल्या तक्रारीवरून मायभूमी ग्रामविकास संस्थेचा सचिव अविनाश ऊर्फ अर्जुन कळमकर,
अध्यक्षा प्रीती विनायक खवले, उपाध्यक्षा प्रमिला अर्जुन कळमकर, खजिनदार कांचन दादाभाऊ ढगे,
सदस्य शिवराम अप्पाजी जासूद, संगीता शिवराम जासूद व अर्जुन माधव कळमकर यांच्यासह अन्य 3 अशा 10 जणांविरुद्ध रविवारी गुन्हा (FIR) दाखल झालाय.
दरम्यान, डिसेंबर 2018 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत कळमकर याने 180 केंद्र चालकांकडून 94 लाख रुपये उकळले आहेत.

या दरम्यान, या प्रकरणात बीएचआरसारखीच कारवाई झाली आहे.
गुन्हा दाखल होण्याआगोदर कळमकर याची संपूर्ण माहिती घेण्यात आलीय. त्याच्या पाळतीवर काहीजण लावण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. प्रवीण मुंढे (SP Dr. Praveen Mundhe) यांनी लगेच
आर्थिक गुन्हे शाखेचे उपाधीक्षक भास्कर डेरे (Dysp Bhaskar Dere) यांना पथक रवाना करण्याचे आदेश दिले.
यावरुन पहाटे अडीच वाजता घरात झोपलेला असतानाच कळमकर याला अटक (Arrested) करण्यात आली आहे.

 

Web Title : Jalgaon Crime | fraud rs 94 lakh using fake policy documents

 

हे देखील वाचा :

Pune Crime | भेसळयुक्त ताडी विक्री व लागणारे साहित्य विक्री करणाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

Thackeray government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना टोल माफ

Rain in Maharashtra | राज्यात 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

 

Related Posts