IMPIMP

Kolhapur Crime | आजारपणाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याने एकमेकांचे हात धरून ‘रंकाळा’ तलावात घेतली उडी

by nagesh
Kolhapur Crime | old couple committed suicide by jumping into rankala lake after struggle with long illness in kolhapur

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइनKolhapur Crime | आजारपणाला कंटाळून (Long Illness) गेलेल्या वृद्ध दाम्पत्याने (Old Couple) एकमेकांचे हात धरून कोल्हापूरातील (Kolhapur Crime) रंकाळा तलावात (Rankala Lake) उडी टाकून आत्महत्या केल्याची (Committed Suicide) दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. विजयमाला धोंडीराम पाटील Vijaymala Dhondiram Patil (वय 75) व धोंडीराम बळवंत पाटील Dhondiram Balwant Patil (वय 80 दोघेही रा. जाधववाडी. मूळ रा. महाडिक वसाहत, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. या बाबतची नोंद जुना राजवाडा पोलिसांत (Juna Rajwada Police Station) झाली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काही वर्षांपूर्वी येथील मध्यवर्ती बसस्थानकात (Central Bus Station) न्यू आनंद सायकल कंपनी होती. त्याचे मालक धोंडीराम पाटील व त्यांच्या पत्नी विजयमाला या मुलांसह महाडिक कॉलनीत राहत होते. आर्थिक परिस्थिती बिघडल्याने काही वर्षांपूर्वी त्यांनी महाडिक वसाहतमधील घर विकले. त्यानंतर ते मुलांसह पाटोळेवाडीत राहिले. दोघांचेही वय झाले होते. त्यातच दोघांनाही दीर्घ आजार जडला होता. त्यामुळे दोघेही पुरते वैतागले होते. विजयमाला यांना फिटचा त्रास होता. (Kolhapur Crime)

 

शनिवारी सायंकाळी दोघेही रंकाळा येथे फिरण्यासाठी गेले होते.
त्याचवेळी तलावात उडी मारून दोघांनीही आत्महत्या केली.
रविवारी रात्री विजयमाला यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडला.
ओळख न पटल्याने सीपीआर रुग्णालयात (CPR Hospital) बेवारस मृतदेह म्हणून ठेवण्यात आला होता.
दरम्यान सोमवारी सायंकाळी धोंडीराम पाटील यांचाही मृतदेह (Dead Body) त्याच ठिकाणी पाण्यावर तरंगताना आढळला. जुना राजवाडा पोलिसांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. धोंडिराम पाटील यांची अंगझडती घेतली त्यावेळी त्यांच्या पँटच्या खिशात दोन ओळखपत्रे सापडली. त्यात विजयमाला पाटील यांचाही फोटो व नाव होते. पोलिसांनी नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. नातेवाईक सीपीआर रुग्णालयात आले असता आई – वडिलांचा मृतदेह पाहून मुलांनी हंबरडा फोडला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अखेरचा प्रवास सोबतच…
मुले मोठी झाली असून त्यांना आपला त्रास नको म्हणून मुलीच्या लग्नानंतर पाटील दाम्पत्य जाधववाडीत भाड्याच्या खोलीत स्वतंत्रपणे राहिले.
त्यानंतर ते शनिवारी रात्री रंकाळ्याला फिरायला आले.
दोघांनीही हातात हात घट्ट पकडून तलावात आत्महत्या करून अखेरचा प्रवास सोबतच केला.

 

Web Title :- Kolhapur Crime | old couple committed suicide by jumping into rankala lake after struggle with long illness in kolhapur

 

हे देखील वाचा :

Buldhana Crime | राहण्यासाठी खोली शोधणाऱ्या दाम्पत्याला 2 नराधमांनी आडवलं, पतीला बेदम मारहाण करत 24 वर्षीय विवाहितेवर केला बलात्कार, परिसरात खळबळ

Post Office | पोस्ट ऑफिसमध्ये केली असेल गुंतवणूक तर 1 एप्रिलपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा मिळणार नाही व्याज

Jalgaon Crime | सेवानिवृत्त शिक्षकांनी 2 अल्पवयीन मुलींवर केले अत्याचार ! पोलिसांनी घेतले ताब्यात, परिसरात प्रचंड खळबळ

 

Related Posts