IMPIMP

Post Office | पोस्ट ऑफिसमध्ये केली असेल गुंतवणूक तर 1 एप्रिलपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा मिळणार नाही व्याज

by nagesh
Post Office | if you have invested in the post office then settle this work before april 1 otherwise you not get interest

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) लोक छोट्या बचतीसाठी गुंतवणूक (Post Office Saving Scheme) करतात. तुम्ही पोस्ट ऑफिसची मासिक बचत योजना (Post Office MIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना, PPF, NSC आणि एफडी यासारख्या योजनेत गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. 1 एप्रिलपासून पोस्ट ऑफिस (Post Office) या सर्व योजनांवरील व्याजाच्या नियमात बदल करणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोस्ट ऑफिसच्या नवीन नियमांनुसार तुम्ही लिकिंग केले नाही तर तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक व्याजाचा लाभ मिळणार नाही. 1 एप्रिल 2022 पासून पोस्ट ऑफिससाठी बदलणार्‍या या नियमाविषयी जाणून घेऊया :

 

 

यामुळे मिळणार नाही व्याज –

ज्यांनी त्यांचे बचत खाते पोस्ट ऑफिसमधील MIS, SCSS, TD सोबत लिंक केलेले नाही. त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवलेल्या रकमेवर व्याज दिले जाणार नाही. उलट हे व्याज पोस्ट ऑफिसच्या वतीने कोषागारात जमा केले जाईल.

पोस्ट ऑफिसनुसार, 1 एप्रिलपासून सर्व योजनांवर मिळणारे व्याज केवळ गुंतवणुकीच्या बचत खात्यात किंवा योजनेशी जोडलेल्या खात्यात हस्तांतरित केले जाईल. यासाठी गुंतवलेल्या रकमेच्या व्याजासाठी अजून बचत खाते उघडले नसेल, तर ते लवकर उघडा.

 

 

खाते असे करा लिंक

  • खातेदाराला SB-83 फॉर्म सबमिट करावा लागेल.
  • यासोबतच, MIS/SCSS/TD खाते तुमच्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याशी लिंक करा.
  • लिंकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, एमआयएस, एससीएसएस, टीडी खात्याचे पासबुक आणि पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या पासबुकची पडताळणी करा.
  • ECS-1 फॉर्मसोबत रद्द केलेला चेक किंवा बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत जमा करावी लागेल.
  • ज्या खात्यात व्याज जमा करायचे आहे त्याची एक प्रतही तुम्हाला द्यावी लागेल.

Web Title :- Post Office | if you have invested in the post office then settle this work before april 1 otherwise you not get interest

 

हे देखील वाचा :

Jalgaon Crime | सेवानिवृत्त शिक्षकांनी 2 अल्पवयीन मुलींवर केले अत्याचार ! पोलिसांनी घेतले ताब्यात, परिसरात प्रचंड खळबळ

Pune Crime | सराईत वाहनचोरांना लोणीकाळभोर पोलिसांनी केली अटक, पावणे तीन लाखांची वाहने जप्त

TET Exam Scam | प्रितीश देशमुखने 20 लाख दिलेला हरीदास ठोळ कोण ? टीईटी गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता

 

Related Posts