IMPIMP

Nandurbar Police | टँकर चोरणाऱ्याला नंदुरबार पोलिसांकडून अटक, 45 लाखाचा मुद्देमाल जप्त

by Team Deccan Express
Nandurbar Police | Tanker thief arrested by Nandurbar police, Rs 45 lakh seized

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाइन – Nandurbar Police | नंदुरबार जिल्ह्यातील लोणखेडा येथील सातपुडा साखर कारखान्यामध्ये (Satpuda Sugar Factory Lonkheda) वाहतुक करण्यासाठी भाडेतत्वावर लावलेले दोन टँकर चोरून (Stealing Tanker) नेणाऱ्या एकाला नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी पंजाब (Punjab) येथील असून त्यांच्याकडून 45 लाख रुपये किमतीचे दोन टँकर जप्त केले आहेत. याबाबत नंदुरबार पोलिसांच्या (Nandurbar Police) शहादा पोलीस ठाण्यात (Shahada Police Station) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.

जोबनप्रितसिंह तरलोकसिंग (Jobanpreet Singh Tarlok Singh), बलविंदरसिंग बलदेवसिंग Balwinder Singh Baldev Singh (दोघे रा. अमृतसर, पंजाब) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी बलविंदरसिंग बलदेवसिग याला अटक केली आहे. याबाबत सुनिलसिंग रघुविरसिंग काला Sunil Singh Raghuvir Singh Kala (वय-45 रा. धानेगाव, ता. जि. नांदेड-Nanded) यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. आरोपी हे टँकरवर चालक म्हणून काम करत होते. 26 फेब्रुवारी रोजी दोघांनी फिर्यादी यांचे दोन टँकर चोरुन नेले होते. (Nandurbar Police)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिलसिंग काला यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय (Transport Business) आहे. त्यांनी त्यांच्या मालकीची 45 लाख रुपये किमतीचे दोन टँकर सातपुडा साखर कारखान्यावर भाडेतत्वावर लावले होते. या टँकरवर आरोपी चालक म्हणून काम करत होते.

आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पंजाब मधील अमृतसर (Amritsar) येथे रवाना करण्यात आले होते. अमृतसर सारख्या मोठ्या शहरात केवळ नावाने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर एकप्रकारचे आव्हान होते. पोलिसांनी आरोपीच्या पत्नीची माहिती काढून तिच्या घराच्या आसपास वेषांतर करुन पाळत ठेवली. आरोपीचे केवळ नाव माहित असल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात अडचण येत होती.

दरम्यान 3 मार्च रोजी आरोपी पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकला मिळाली. पोलिसांनी आरोपीच्या घराभोवती सापळा रचला. आरोपी पत्नीला भेटण्यासाठी आला असता त्याला पोलिसांचा सुगावा लागला. आरोपीने तेथून पळून गेला. पोलिसांनी त्याचा एक किमी पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने टँकर चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या दुसऱ्या साथिदाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बलविंदरसिंग याचा दुसरा साथिदार जोबनप्रितसिंग याला पकडण्यासाठी मेहता येथे सापळा रचला. मात्र पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच तो पळून गेला.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

अटक करण्यात आलेला आरोपी बलविंदरसिंग बलदेवसिंग (वय-39 रा. पिखीपिंड जि. तारण, पंजाब)
याला शहादा न्यायालयात (Shahada Court) हजर केले असता न्यायालयाने त्याला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
आरोपीकडे चोरीच्या टँकर बाबत विचारले असता त्याने ते टँकर धुळे जिल्ह्यातील (Dhule District)
पिंपळनेर ताहराबाद रस्त्यावरील (Pimpalner Tahrabad Road) पाटील ढाबा येथे लपवून ठेवल्याची माहिती दिली.

पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर-ताहराबाद रस्त्यावरील पाटील ढाबा येथून 45 लाख रुपये किमतीचे दोन टँकर जप्त केले आहेत.
फरार आरोपी जोबनप्रितसिंग तरलोकसिंग याला लवकरच अटक केली जाईल,
असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील (Superintendent of Police PR Patil) यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil), अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (Police Inspector Ravindra Kalamkar),
सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील (API Sandeep Patil), पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक मोहन ढमढेरे,
विजय ढिवरे यांच्या पथकाने केली. पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांनी पथकाला बक्षीस जाहीर केले आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Nandurbar Police | Tanker thief arrested by Nandurbar police, Rs 45 lakh seized

 

हे देखील वाचा :

Related Posts