IMPIMP

Nandurbar Police | गोडावूनमधून धान्य चोरणाऱ्या तिघांना अटक, नंदुरबार पोलिसांची परराज्यात मोठी कारवाई

by Team Deccan Express
Pune Crime | Two arrested in Ashti for Painter Murder Case Manjri Pune Police Crime News

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाइन – Nandurbar Police | धान्य खरेदी- विक्रीच्या गोडावूनमधून धान्याची चोरी करुन त्याची परराज्यात विक्री करणाऱ्या तिघांना नंदुरबार पोलिसांच्या (Nandurbar Police) स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upnagar Police Station) संयुक्त पथकाने बेड्या (Arrest) ठोकल्या आहे. नंदुरबार पोलिासंनी परराज्यात जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार 24 फेब्रुवारी रात्री 8 ते 25 फेब्रुवारी सकाळी 9 या कालावधीत घडला होता. चोरट्यांनी गोडावूनमधून 4 लाख 15 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता.

 

रघुवीर जनकसिंग चौहान Raghuveer Janak Singh Chauhan (वय-45 रा. सेलंबा, ता. सागबारा, जि. नर्मदा), ईश्वर देवल्या वसावा Ishwar Devalaya Vasava (वय-37 रा. बावली ता. सोनगड जि. तापी), संजय दामु वसावे Sanjay Damu Vasave (वय-45 रा. पाटील फळी, रायंगण, ता. नवापुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत धनेश मोहनदास सेलवाणी Dhanesh Mohandas Selvani (वय-45 रा. आदर्श नगर, नंदुरबार) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला. (Nandurbar Police)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनेश सेलवाणी याचे धानोरा चौफुली (Dhanora Chaufuli) येथे श्री शनेश्वर ट्रेडींग (Shri Shaneshwar Trading) व शिवसागर ट्रेडर्स (Shivsagar Traders) नावाचे धन्य खरेदी विक्रीचे गोडावून आहे. 24 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता बंद करुन घरी गेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी ते गोडावूनमध्ये आले असता गोडावूनचा मागील बाजुचा पत्रा कापल्याचे दिसले. चोरट्यांनी गोडावूनमधील 4 लाख 5 हजार 600 रुपये किमतीचे 3120 किलो वजनाचा अजवाईन (ओवा), 5500 रुपये किमतची 100 किलो तुर डाळ, 4800 रुपये किमतीचे 120 किलो ओव्याचा भुसा चोरुन नेल्याचे दिसून आले.

 

या घटनेचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Superintendent of Police P.R. Patil) यांनी गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) आणि उपनगर पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक तयार करुन आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (Police Inspector Ravindra Kalamkar) व उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे (Police Inspector Narendra Bhadane) यांना माहिती समजली की, गुजरातमधील (Gujarat) नर्मदा जिल्ह्यातील (Narmada District) सेलंबा येथे एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात अजवाईन विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सेलंबा येथे जाऊन अजवाईन विक्री करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची माहिती काढून रघुवीर चौहान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याला सोनगड तालुक्यातील (Songad Taluka) बावली येथील ईश्वर याने अजवाईन दिल्याचे सांगितले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

पथकाने तातडीने बावली येथे जाऊन ईश्वरची माहिती मिळवली. मात्र, तो सापडत नव्हता. अखेर तो एका शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शेतातून आरोपी ईश्वर वसावा याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने नवापुर तालुक्यातील (Navapur Taluka) रायंगण येथील संजुने अजवाईन विक्री करण्यासाठी दिल्याची माहिती पथकाला दिला.

 

त्यानुसार पथकाने रायंगण येथे जाऊन संजूची माहिती काढली असता तो गावात नसून
नवापूर येथील एका पोल्ट्री फॉर्मवर चालक म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने नवापूर येथील पोल्ट्री फार्ममध्ये गेले असता त्याठिकाणी संजू पोलिसांना दिसला.
पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र, पथकाने त्याला ताब्यात घेतले.
सुरुवातीला त्याने गुन्ह्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने साथिदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे सांगितले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

पथकाने या गुन्ह्यात तीन जणांना अटक केली असून या गुन्ह्यातील इतर गुन्हेगारांना लवकरच अटक करण्यात येईल.
तसेच गुन्ह्यातील चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सांगितले.

 

ही कारवाई नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil),
अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar),
उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Sub Divisional Police Officer Sachin Hiray)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,
उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील (API Sandeep Patil),
पोलीस हवालदार मुकेश तावडे, महेंद्र नगराळे, सजन वाघ, पोलीस नाईक मनोज नाईक,
पोलीस अंमलदार शोएब शेख, उपनगर पोलीस ठाणातील पोलीस हवालदार केशव गावीत व पोलीस नाईक अंकुश गावीत यांच्या पथकाने केली.

 

Web Title :– Nandurbar Police | Three arrested for stealing food grains from Godavun

 

हे देखील वाचा :

Related Posts