IMPIMP

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : सदनिकेत सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दलाल महिलेसह घरमालकावर गुन्हा (Video)

by sachinsitapure

पिंपरी :  – Pimpri Chinchwad Crime Branch | सोसायटीमधील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश (Prostitution Racket) करुन एका दलाल महिलेला अटक केली आहे. तर घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत दोन पिडीत महिलांची सुटका केली आहे. घरमालकाने भाडेकरार न करता फ्लॅट भाडेतत्त्वावर दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (Pimpri Chinchwad AHTU) मंगळवारी (दि. 11) सायंकाळी पाचच्या सुमारास रहाटणी (Rahatani) येथे केली.

दलाल महिलेसह दशरथ जंगल कोकणे (Dasaratha Jungle Konkane) याच्या विरोधात 370(3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5,7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याबाबत महिला पोलीस अंमलदार संगिता जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दलाल महिलेने दशरथ कोकणे याच्याशी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशांचे अमिष दाखवले. त्यातून त्या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेकडील अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळाली.

पोलिसांच्या पथकाने दशरथ कोकणे याच्या रहाटणी येथील शिवीजी चौकातील दुसऱ्या मजल्या वरील फ्लॅटमध्ये अचानक छापा टाकला असता आरोपी दलाल महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलाकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन तरुणींची सुटका करुन महिलेला अटक केली. तपासा दरम्यान आरोपी दशरथ कोकणे याने कोणताही भाडेकरार न करता महिलेला भाडेतत्वावर फ्लॅट दिल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांच्या पथकाने केली आहे.

Related Posts