IMPIMP

Pune Crime | रस्त्यातील बॅरिकेटस न दिसल्याने टेम्पोच्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यु

by nagesh
 Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | रस्त्यामध्ये बॅरिकेटस (Barricade) आल्याने त्याला वाचवून बाजूने जात असताना मागून आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने मोटारसायकलवरील माजी सैनिकाचा मृत्यु (Death) झाला. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अचित दिनकर पाटील Achit Dinkar Patil (वय ४०, रा. महर्षी वाल्मीकी सोसायटी, येरवडा) असे मृत्यु पावलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. हा अपघात (Accident In Vishrantwadi) विश्रांतवाडी येथील एच डी एफ सी शाखेसमोरील सार्वजनिक रोडवर ५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडला.

 

याबाबत त्यांचे भाऊ सुशांत इंगळे पाटील Sushant Ingle Patil यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात
(Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचित पाटील हे सैन्य दलातून निवृत्त झाले असून सध्या खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये (World Trade Center) सुरक्षा गार्ड (Security Guard) म्हणून काम करीत होते.
टि बी २ येथे राईझिंग डे निमित्त पार्टी असल्याने ते टि बी २ सेंटरला गेले होते. तेथून रात्री ११ वाजता
मोटारसायकलवरुन घरी जात होते. विश्रांतवाडी चौक पास करुन पुढे आल्यावर एच डी एफ सी शाखेसमोरील
सार्वजनिक रोडवर समोर अचानक बॅरिकेटस दिसल्याने त्यांनी ते वाचवून कडेने गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी पाठीमागून वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांना धडक दिली. ते मोटारसायकलवरुन उजव्या बाजूस रस्त्यावर
पडले. त्यांच्या दोन्ही पायास खरचटले.
डोक्यात हेल्मेट असूनही टेम्पोचे चाक डोक्यावरुन गेल्याने ते गंभीर जखमी झाले. टेम्पोचालक न थांबता पळून गेला.
नागरिकांनी त्यांना ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) आणले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचां मृत्यु झाला. रस्त्यात लावलेल्या बॅरिकेटसमुळे एका माजी सैनिकाला आपला जीव गमवावा लागला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | An ex-serviceman died in a collision with a tempo due to not seeing the barricades on the road

 

हे देखील वाचा :

LIC New Policy | LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लान, जाणून घ्या लाभ, वैशिष्ट्ये आणि इतर तपशील

Mutual Fund | 5 स्टार रेटिंगच्या 5 दमदार स्कीम; रू. 10,000 मंथली SIP ने 3 वर्षात झाला 7.29 लाखापर्यंत फंड, जाणून घ्या रिटर्न

Pune PMC News | महापालिकेच्या सेवा- सुविधा आता ‘व्हॉटस् ऍप चॅटबॉटवर’ सुरू ; पहिल्या टप्प्यातील मिळकत कर सेवेस प्रारंभ

 

Related Posts