IMPIMP

Pune PMC News | महापालिकेच्या सेवा- सुविधा आता ‘व्हॉटस् ऍप चॅटबॉटवर’ सुरू ; पहिल्या टप्प्यातील मिळकत कर सेवेस प्रारंभ

by nagesh
 Pune PMC Property Tax News | Now the municipal corporation's march to the income tax arrears! Will seal the income of big arrears, charge the businessmen for change of use

 मो. क्र. ८८८८२५१००१ सेव्ह करा आणि सेवेचा लाभ घ्या : रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

 

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC News | संदेश वहनासाठी सर्वाधीक लोकप्रिय ठरलेल्या मोबाईलवरील ‘व्हॉट्सॲपचा’ महापालिकेने नागरी सुविधांसाठी वापर करण्यास सुरूवात केली आहे. सेवा हमी कायद्यानुसार द्याव्या लागणार्‍या सेवा पुणेकर नागरीकांना २४ तास आणि वर्षातील ३६५ दिवस जगभरात कुठूनही मिळाव्यात यासाठी मोबाईल क्र. ८८८८२५१००१ वर ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ (WhatsApp Chatbot) ही सुविधा सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात व्हॉट्सॲपवर या क्रमांकावर केवळ ही अक्षरे टाईप केल्यानंतर मिळकतधारकांना मिळकत कराच्या (Property Tax) पावतीपासून, थकबाकी (Outstanding), एनओसी (NOC) तर मिळेलच परंतू यावरील लिंकवरून सुरक्षितरित्या मिळकत कर भरणाही करता येणार आहे. अशी सुविधा देणारी देशातील बहुतांश पहिली महापालिका असल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Addl Commissioner Ravindra Binawade) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बिनवडे यांनी सांगितले, की महापालिकेच्यावतीने (Pune PMC News) नागरिकांना विविध सुविधा देण्यात येतात. परंतू तंत्रज्ञान विकसित होण्यापुर्वी नागरिकांना प्रत्येक कामासाठी महापालिकेच्या कार्यालयांत जावे लागत. ई गर्व्हनन्स सुरू झाल्यानंतर महापालिकेने विविध सेवा ऑनलाईन सुरू केल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासाच्या पुढील टप्प्यात जवळपास प्रत्येक नागरिक मोबाईल वर वापरत असलेल्या ‘व्हॉटस् ऍप’बॉटचा उपयोग करून नागरिकांना अधिक जलदगतीने आणि अगदी जगात कोठेही बसून महापालिकेशी संबधित सेवा, सुविधा एका क्लिक करून मिळू शकणार आहेत.

 

यासाठी महापालिकेने व्हॉटस् ऍपकडून ८८८८२५१००१ हा विशेष क्रमांक घेतला आहे. नागरिकांनी मोबाईलमध्ये हा क्रमांक सेव्ह केल्यानंतर केवळ हा शब्द टाईप केल्यानंतर पुढील संवाद सुरू होणार आहे. या व्हॉटस् ऍप बॉटवरून नागरिकांना पहिल्या टप्प्यात मिळकत क्रमांक टाईप केल्यानंतर कराची देय रक्कम, कर भरलेली रक्कम, कराची पावती, थकबाकी नसल्यास एनओसी मिळू शकणार आहे. मिळकत कराची रक्कम ऑनलाईन भरायची असल्यास लिंकही मिळणार आहे. मिळकत क्रमांकाशी (प्रॉपर्टी आयडी) मोबाईल क्रमांक आणि इ मेल आयडी देखिल लिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच अंदाजे मिळकत कर मोजणे तसेच नवीन मिळकत अथवा अतिरिक्त बांधकामासाठीसाठी स्व मुल्यांकनाचीही सुविधा या व्हॉटस् अपॅ चॅटबॉटवर मिळणार आहे. (Pune PMC News)

 

पुढील टप्प्यात पाणी पट्टी, जन्म मृत्यू दाखले, पाळीव प्राण्यांची नोंदणी, बांधकाम प्रस्ताव दाखल करणे,
यासारख्या दैनंदीन निगडीत गरजांसोबतच तक्रार नोंदणीची सुविधा याच व्हॉटस् ऍप चॅटबॉटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या व्हॉटस् ऍप बॉटमुळे नागरिकांची वेळेची आणि पैशांची बचत होणार असून अडथळे कमी
होउन पेपरलेस काम करण्याच्या दिशेने मोठा उपयोग होईल,
असा दावाही बिनवडे यांनी केला आहे. याप्रसंगी महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख उपायुक्त प्रतिभा पाटील,
राहुल जगताप, मिळकत कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे- धुमाळ (Assistant Commissioner Asmita Tambe-Dhumal) या उपस्थित होत्या.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune PMC News | Municipal services-facilities are now available on ‘Whats App Chatbot’; Commencement of First Phase Income Tax Service

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हिंदुराष्ट्रसेनेच्या तुषार हंबीरवर हल्ला करणाऱ्या चौघांकडून पिस्टल, तलवार जप्त

Cyrus Mistry Accidental Death – insurance Claims | सीट बेल्ट लावला नसेल तर इन्शुरन्स क्लेम नाकारला जाऊ शकतो का? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट

Dussehra Melava | शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा होणार? देवेंद्र फडणवीसांचे पुण्यात सूचक वक्तव्य

Pune Market Yard | अनंत चतुर्दशीला पुण्यातील मार्केट यार्ड (फळे, भाजीपाला, फुल बाजार) बंद राहणार, ‘शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये’

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्ता यांच्याकडून प्रभावीपणे Action

 

Related Posts