IMPIMP

Pune Lonikand Crime | पुणे: 1 एप्रिलच्या रात्री घडलेला ‘हा’ प्रकार ठरला कारणीभूत? हॉटेलवर कारवाई केल्याच्या रागातून लोणीकंद पोलीस स्टेशन समोर आत्महत्येचा प्रयत्न (Videos)

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Lonikand Crime | नियमांचे उल्लंघन करुन रात्री उशीरापर्यंत हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मधील कामगारावर कारवाई केली. याचा राग आल्याने हॉटेल मालकांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या (Lonikand Police Station) मेन गेट समोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी (दि.1) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस शिपाई अमोल आबासाहेब गायकवाड (वय-35 रा. कोरेगाव भिमा) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सत्यवान हौशीराम गावडे Satyawan Haushiram Gawde (वय-34), राम अशोकराव गजमल Ram Ashokrao Gajmal (वय-22 दोघे रा. उबाळेनगर, वाघोली) यांच्यावर आयपीसी 506, 309 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे उबाळेनगर वाघोली (Ubale Nagar Wagholi) येथे न्यु प्यासा हॉटेल (New Pyasa Hotel Wagholi) आहे. आरोपींनी नियमांचे उल्लंघन करुन रात्री उशीरापर्य़ंत हॉटेल सुरु ठेवले. त्यामुळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे (PI Seema Dhakane) यांनी कारवाई करुन हॉटेलमधील कामगार राम गजमल याच्यावर गुन्हा दाखल केला. याचा राग आरोपींच्या मनात होता. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता आरोपी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या मेन गेट समोर आले. त्यांनी सोबत आणलेला ज्वलनशिल पदार्थ अंगावर ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt To Suicide) केला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे (Kailas Kare Sr PI), पोलीस निरीक्षक गुन्हे सीमा ढाकणे, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे (API Ravindra Godse), सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले (API Chetan Thorbole)यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे करीत आहेत.

Pune Pashan Crime | पुणे : पाठलाग करुन लग्नाची मागणी, अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन करुन विनयभंग

Related Posts