IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : बनावट ऑफर लेटर देऊन तरुणीची आर्थिक फसवणूक, दोघांवर FIR

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून (Lure Of Job) तिच्याकडून रोख व ऑनलाईन पैसे घेऊन नोकरी न लावता फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत वाकड येथील भुमकर चौक (Bhumkar Chowk Wakad) रोडवरील सिद्धीविनायक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व हिंजवडी येथील बॅक्सेस प्रा. लि. कंपनीच्या ऑफिसमध्ये घडला आहे.

याबाबत पुजा गुरुराज पाटील (वय-25 रा. केशवनगर, मुंढवा) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रदीप उर्फ विक्रांत राजू भोसले Pradeep alias Vikrant Raju Bhosle(रा. आळंदी, पुणे), परेश देविदास पाटील Paresh Devidas Patil (रा. चिंचवड, पुणे) याच्यावर आयपीसी 409, 419, 420, 465, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुजा पाटील या नोकरीच्या शोधात होत्या. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. आरोपींनी बेक्सेस प्रा. लि. कंपनीमध्ये चार लाख रुपये अॅनुअल पॅकजची नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. नोकरी लावण्यासाठी आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांच्याकडून रोख व ऑनलाइन दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्य़ादी यांना बनावट ऑफर लेटर त्यांच्या इमेलवर पाठवून नोकरी लागल्याचे भासवले. मात्र, ऑफर लेटर बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली. आरोपींनी पैसे परत न करता फिर्यादी यांची दोन लाखांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी करीत आहेत.

Ravindra Dhangekar | शैक्षणिक कर्जमाफीची काँग्रेसने दिलेली गॅरंटी असंख्य पालकांसाठी दिलासाजनक – रवींद्र धंगेकर

Related Posts