IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : ‘तुम्ही आमच्या गँगला दम देता का’ म्हणत दोघांवर कोयत्याने वार, दहशत पसरवणाऱ्या चार जणांना अटक

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणातून सहा जणांच्या टोळीने दोघांना कोयत्याने बेदम मारहाण केली (Koyta Attack). तसेच कोयता हवेत फिरवून ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना 16 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता भोसरीतील चक्रपाणी वसाहत (Chakrapani Vasahat Bhosari) येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी ओंकार मल्हारी दळवी (वय 22 रा. दिघी), योगेश जगन्नाथ मुळे (वय 21), गणेश कृष्णा गवारी (वय 19), विजय वीरेंद्र चव्हाण (वय 18 सर्व राहणार भोसरी) या चौघांना अटक केली आहे. तर त्यांचे साथीदार तेजस डोंगरे व सचिन येरे यांच्यावर 307, 323, 504, 506 143, 147, 148, 149 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल विठ्ठल साळवे (वय-19 रा. सदगुरुनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosar Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल साळवे हे देवकर वस्ती येथील एसटीबी इंजिनिअरिंग येथे थांबले होते. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन विशाल सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी योगेश मुळे याने फोन करुन ओंकार दळवी याला बोलावून घेतले. त्यावेळी आरोपी चारचाकी गाडीतून त्याठिकाणी आले. आरोपी ओंकार याने हातात कोयता घेऊन तुम्ही आमच्या गँगला दम देता काय असे म्हणत शिवीगाळ केली. आरोपींनी विशाल याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच विशालचा साथीदार लक्ष्मण आखाडे याला पकडून ठेवले. आरोपी ओंकार याने विशालच्या पाठीत आणि लक्ष्मणच्या डोक्यात कोयता मारुन गंभीर जखमी केले. तसेच हवेत कोयता फिरवून मी आत्ताच ‘मोक्का’ मधून बाहेर आलो आहे. ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत दहशत निर्माण केली. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Ajit Pawar | महायुतीच्या व्यासपीठावर पुन्हा अजित पवार प्रकटले…आणि नाराजीच्या चर्चेला मिळाला पूर्णविराम!

Related Posts