IMPIMP

Shirdi Crime | शिर्डीत गोळीबाराचा थरार ! भल्या पहाटे तरुणावर झाडल्या गोळ्या; शिर्डीत खळबळ

by nagesh
Pune Crime | 8-year-old girl shot, injured in husband-wife fight; Incident in Narhe, construction workers in police custody

शिर्डी : सरकारसत्ता ऑनलाइन शिर्डी शहर (Shirdi Crime) आज गोळीबाराच्या (firing) घटनेने हादरुन गेले आहे. शिर्डी शहरातील (Shirdi Crime) लक्ष्मीनगर भागात एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने (unknown person) गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना लक्ष्मीनगर (Laxminagar) भागातील एका खासगी पार्किंगमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गोळीबाराच्या आवाजाने नागिरकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

गोळीबाराच्या या घटनेत सूरज ठाकूर (Suraj Thakur) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना घडताच स्थानिक नागरिकांनी सूरजला तात्काळ शिर्डीतील (Shirdi Crime) साईबाबा सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात (Saibaba Super Specialist Hospital) उपचारासाठी दाखल केले आहे. भल्या पहाटे गोळीबार घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण असून जखमी सूरज याच्यावर उपचार केले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्यातील (Shirdi Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

दरम्यान, हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही. हल्ल्यामागच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरु केला आहे. तसेच पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Shirdi Crime | young man injured in gun firing in shirdi

 

हे देखील वाचा :

Anemia | शरीरात रक्ताची कमतरता? वेगाने रक्त तयार करू शकतात खाण्या-पिण्याच्या ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या

Omicron Covid Variant Pune | कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर अजित पवारांचा इशारा; म्हणाले – ‘…तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार’

Sanjay Khapre | ‘स्टोरी ऑफ लागीरं’मध्ये संजय खापरे महत्त्वपूर्ण भूमिकेत ! 14 जानेवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटाचं पोस्टर लाँच

 

Related Posts