IMPIMP

‘कोरोना’ पॉझिटिव्ह असूनही शूटिंगला गेली अभिनेत्री गौहर खान ! FIR दाखल

by pranjalishirish
gauhar khan tested positive but no followed covid guidelines

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस 7 ची विनर गौहर खान (Gauahar Khan) हिला कोरोनाची बाधा झाली आहे. तिला क्वाॅरंटाइन करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ती शूटिंगला गेल्याचंही समजत आहे. कोरोना झाला असूनही ती Gauahar Khan शूटिंगला गेल्यानं तिच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचं समजत आहे. ओशीवारा पोलिसांच्या माहितीनुसार, गौहरचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळं तिला क्वाॅरंटाइन करण्यात आलं होतं. महापालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, अंधेरीतल्या तिच्या घरी जेव्हा ते गेले तेव्हा कुणीच दार उघडलं नाही. नंतर समजलं की, ती शूटिंगसाठी बाहेर गेली आहे. यानंतर त्यांनी ओशीवारा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

यानंतर गौहरविरोधात Gauahar Khan गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीच्या दंडसंहितेच्या साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत कलम 188, 269, 270, 51 ब नुसार ओशीवारा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

महापालिकेनंदेखील ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, शहराच्या सुरक्षेसंदर्भात कसलीही तडजोड केली जाणार नाही.
कोरोनाबाधित असतानाही कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नियम सर्वांसाठी सारखेच आहेत.
आमची नागरिकांना विनंती आहे की, या नियमांचं पालन करा आणि शहराला कोरोनाला हरवण्यासाठी मदत करा.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Related Posts