IMPIMP

Video : बाळाला दूध पाजताना दिसली रिंकू राजगुरू ! सोशलवर जोरदार व्हायरल झाला व्हिडीओ

by sikandershaikh
rinku-rajguru

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)सैराट सिनेमातून सर्वांच्या मनात घर करणारी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सोशल मीडीयावर सतत अॅक्टीव असते. रिंकु सोशल मीडियावरून कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकू तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची काही माहिती असेल तर तीही चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. सध्या एका व्हिडीओमुळं रिंकू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

रिंकूनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिच्या कडेवर एक लहान बाळ दिसत आहे. रिंकू या बाळाला दूध पाजत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमधून लक्षात येत आहे की, हे बाळ रिंकुचा भाचा आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या बाळाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रिंकुचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे.

रिंकुच्या (rinku rajguru) वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती छूमंतर या आगामी सिनेमात काम करताना दिसणार आहे.
नुकताच तिचा अनपॉज्ड हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आहे.
यात 5 लघुपट आहेत. यातील रॅट ए टॅट मध्ये रिंकु दिसली होती.
काही दिवसांपूर्वीच ती हंड्रेड वेब सीरिजमध्ये दिसली आहे.
लवकरच ती झुंड या हिंदी सिनेमात काम करताना दिसणार आहे.
तिच्या लुकचं पोस्टरही रिलीज झालं आहे.
सैराटनंतर तिनं मेकअप, कागर अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

Related Posts