IMPIMP

7th Pay Commission | मोदी सरकारकडुन दिवाळी दरम्यान ‘या’ कर्मचाऱ्यांना मिऴु शकते मोठी भेट

by nagesh
DA-DR Hike | da hike dr hike central government employees pensioner salary hike house rent allowance 7th pay commission news

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मोदी सरकारने (Modi government) महागाई भत्त्यातली वाढ मे 2020 मध्ये दिली नव्हती. दरम्यान, यंदा मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक मोठी खुशखबर दिली आहे. दिवाळीला मोदी सरकार (Modi government) आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक भेट देणार आहे. जुलै महिन्यात महागाई भत्त्यात 17 टक्के वाढ करून तो 28 टक्के तर घरभाडे भत्ता 24 टक्क्यांनी वाढवून ते 27 टक्के केला. (7th Pay Commission) आता महागाई भत्ता पुन्हा 3 टक्क्यांनी वाढणार आहे. तो वाढुन 31 टक्के होईल.

 

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) मिळणारा 17 टक्के महागाई भत्ता सरकारने साधारणपणे कोरोनाच्या काळात दीड
वर्षं दिला नव्हता. या विषयातील तज्ज्ञांच्या मते, लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांना 11 हजार 880 रुपयांपासून ते 37 हजार 554 रुपयांपर्यंत DA एरियर्स
म्हणजेच थकबाकी मिळू शकतात. तसंच पे-स्केल लेव्हल -14 वर असलेल्या कर्मचाऱ्यांना डीएचे 1 लाख 44 हजार 200 ते 2 लाख 18 हजार 200 रुपये
मिळू शकतात. दरम्यान, जेसीएमची राष्ट्रीय परिषद, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग तसंच केंद्रीय अर्थ मंत्रालय यांच्या अधिकाऱ्यांची 26 -27 जून 2021
ला बैठक झाली. त्या बैठकीत काय झालं याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 महागाईचा फटका बसू नये म्हणून दिला जातो DA…

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) वेतनात (Salary) विविध भत्ते
दिले जातात. त्यात महागाई भत्ता दिला जातो. वाढत्या महागाईच्या त्या कुटुंबाला झळ लागू नये म्हणून हा भत्ता
दिला जातो. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढला आहे. सरकारने जुलै 2021 मध्ये तो 28 टक्के केला होता. आता जर त्यात 3
टक्के वाढ झाली तर महागाई भत्ता 31 टक्क्यांवर पोहोचेल. याचंच एक उदाहरण म्हणजे, जर एखाद्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 50 हजार
रुपये असेल तर त्याला 15 हजार 500 महागाई भत्ता मिळेल.

 

दरम्यान, केंद्राप्रमाणेच राज्यांनीही DA वाढवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, हरियाणा, कर्नाटक, राजस्थान आणि आसाम
या राज्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा (State Government employees) DA वाढवण्याचा निर्णय घेतला. देशात वाढत्या महागाईचा परिणाम कमी
करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते आणि तो भत्ता वेळोवेळी वाढवलाही जातो. दरम्यान, यंदा DA थकबाकी मिळू शकणार
आहे. हा भत्ता दिवाळीच्या वेतना दरम्यान मिळु शकते. त्यामुळे ही एक मोदी सरकारची (Modi government) भेट असणार आहे.

 

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission central government employees will get rs 218200 on diwali check calculation here

 

हे देखील वाचा :

Crime in Virar | भल्या पहाटे मंदिरात जाताना बड्या बिल्डरचा निर्घृण खून, शहरात प्रचंड खळबळ

Corona Vaccine | क्यूबामध्ये 2 वर्षांच्या मुलांना सुद्धा कोरोना व्हॅक्सीन देणे सुरू, बनला जगातील पहिला देश

Sharad Pawar | …यापुढे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित रहाणार नाही – शरद पवार

 

Related Posts