IMPIMP

IPO News | १८० पट सब्सक्रिप्शन, आयपीओ खरेदी करण्यासाठी चढाओढ, भाव ८३ रुपये

by sachinsitapure
IPO News

नवी दिल्ली : IPO News | आयपीओवर डाव लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी (Investor) एक आनंदाची बातमी आहे. सनगार्नर एनर्जी लिमिटेड आयपीओ (Sungarner Energies Limited IPO) मध्ये गुंतवणुकदारांनी मोठी गुंतवणूक (Investment) केली आहे. ३ दिवसांच्या सबस्क्रिप्शन ओपनिंग दरम्यान आयपीओ १८० पट पेक्षा जास्त सबस्क्राइब झाला. (IPO News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

जीएमपी म्हणजे काय (Sungarner Energies Limited IPO GMP Today)?
टॉप शेअर ब्रोकरच्या (Top Share Brokers) रिपोर्टनुसार, ग्रे मार्केटमध्ये बुधवारी आयपीओ रु. २८ च्या प्रीमियमवर ट्रेडिंग करत होता. म्हणजेच, जर हा ट्रेंड लिस्टिंग होईपर्यंत चालू राहिला तर कंपनी शेअर बाजारात रु.१११ च्या आसपास पदार्पण करू शकते. गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी ३३.७३ टक्के नफा होऊ शकतो.

लिस्टिंगवर सर्वांच्या नजरा (Sungarner Energies Limited IPO share allotment)
कंपनीकडून गुंतवणूकदारांना शेअर्सचे अलॉटमेंट २८ ऑगस्ट २०२३ रोजी होईल. कंपनीचे लिस्टिंग ३१ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. कंपनी एनएसई एसएमई वर लिस्ट होईल. सनगार्नर एनर्जीज लिमिटेडच्या आयपीओची प्राईस बँड रु. ८३ होती. कंपनीने १६०० शेअर्सचा एक लॉट बनवला आहे. ज्यामुळे एका गुंतवणूकदाराला किमान १,३२,८०० रुपये गुंतवावे लागले.

 

Related Posts