IMPIMP

EPFO | ‘पीएफ’वर 8.5 टक्के व्याजाची मिळाली मंजूरी, दिवाळीपूर्वी मिळू शकते रक्कम; जाणून घ्या

by nagesh
EPFO | epfo if pf account holders make big mistake then all money will be

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. ईपीएफओ दिवाळीच्या अगोदर आर्थिक वर्ष 2020-21 साठी व्याजदर क्रेडिट करू शकतो. ही बातमी अशावेळी आली आहे जेव्हा केंद्रीय कर्मचार्‍यांना महागाई भत्ता आणि पेन्शनर्सला महागाई मदतीची भेट दिली आहे. या निर्णयानंतर महागाई, आर्थिक संकट आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीने हैराण झालेल्या कर्मचार्‍यांना दिलासा मिळू शकतो.

 

रिपोर्टनुसार, EPFO च्या केंद्रीय बोर्डाने व्याजदरवाढीला मंजूरी दिली आहे आणि विभागाला आता अर्थ मंत्रालयाची मंजूरी हवी आहे.
ईपीएफओने 2020-21 साठी 8.5 टक्के व्याजदरासाठी अर्थ मंत्रालयाकडून अंतिम मंजूरी मागितली होती.
जो ठरवण्यात आला आहे. आता प्रतिक्षा केवळ अर्थ मंत्रालयाकडून आहे, जे लवकरच यावर सहमती देऊ शकते.

 

निवृत्ती फंड आपल्या ग्राहकांना व्याजदराचे पेमेंट करण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे.
मंत्रालयाकडून प्रोटोकॉलनुसार मंजूरी मागण्यात आली आहे कारण ईपीएफओ या मंजूरीशिवाय व्याज जमा करू शकत नाही.

 

सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 च्या दरम्यान ईपीएफ व्याजदर कमी करून 7 वर्षाच्या खालच्या स्तरावर 8.5 टक्के केला होता.
जो आर्थिक वर्ष 2018-19 च्या दरम्यान 8.65 टक्के, आर्थिक वर्ष 2017-18 च्या दरम्यान 8.55 टक्के आणि आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 8.65 टक्के होता. ईपीएफओमध्ये 6 कोटी सदस्य आहेत.
मेंबर्स मिस्ड कॉल, एसएमएस किंवा उमंग अ‍ॅपद्वारे अकाऊंटमध्ये व्याज जमा झाले का, हे तपासू शकतात.

 

Web Title : EPFO | epfo approved 8 5 percent interest can be received before diwali

 

हे देखील वाचा :

Post Office | फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दरमहा होते कमाई, द्यावा लागत नाही टीडीएस; ‘इतकी’ करावी लागेल गुंतवणूक, जाणून घ्या

Skin Care Tips | लॅपटॉप आणि मोबाइलच्या अधिक वापरामुळे तुमच्या त्वचेचे होऊ शकते नुकसान, ‘या’ पध्दतीनं काळजी घ्या

Pune Crime | तडीपार गुंडाची पोलिसांना धक्काबुक्की, धमकी देत म्हणाला – ‘तुम्हाला बघून घेतो’

 

Related Posts