IMPIMP

UPI Payment | इंटरनेटशिवाय करता येते पेमेंट, जाणून घ्या UPI पेमेंटची पूर्ण प्रक्रिया

by nagesh
UPI Payments Without Internet | how to make online upi payments without internet connection know simple steps

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील काही काळात युपीआयवरुन पेमेंट (UPI Payment) करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा इंटरनेटचा स्पीड (Internet speed) कमी किंवा नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने UPI वरुन पेमेंट होत नाही. परंतु एक पद्धत अशीही आहे ज्याचा वापर करुन तुम्ही इंटरनेटशिवाय UPI वरुन पेमेंट (Payment) करु शकता. ऑफलाईन पेमेंट करण्यासाठी एक USSD कोड असतो. तो तुम्ही फोनच्या डायलवरुन अ‍ॅक्सेस करु शकता. ही सेवा सर्व मोबाईल युझर्ससाठी उपलब्ध आहे. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेटचे कनेक्टिव्हिटीची (Internet connectivity) गरज नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

USDD बाबत माहिती

इंटरनेट शिवाय युपीआय पेमेंट करण्यासाठी एक क्रमांक आहे. तो *99# हा आहे. म्हणजेच तुम्हाला इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करायचे असेल तर तुम्हाला फोनमध्ये जाऊन *99# डायल करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर एक मेनू येईल. यामध्ये तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी सेंड मनीचा (Send money) पर्याय दिसले. सेंड मनीचा पर्याय ऑप्शन  नंबर 1 वर असतो. त्यामुळे तुम्हाला 1 लिहून USDD वर रिप्लाय द्यावा लागेल. म्हणजेच तुम्हाला 1 लिहावं लागेल आणि सेंड पर्यायावर क्लिक करावं लागेल.

 

येथे पुन्हा अनेक पर्याय तुमच्यासमोर दिसतील. यामध्ये कुणाचा मोबाईल क्रमांक, यूपीआय, बँक अकाऊंटवर पैसे पाठवण्याचा पर्याय मिळेल. त्यामधील ज्या पर्यायावर पैसे पाठवायचे असतील तो पर्याय सिलेक्ट करा.

 

त्यानंतर तुम्ही निवडलेल्या पर्यायाच्या हिशोबाने पैसे रिसिव्ह करणाऱ्याच्या बँक अकाऊंट, यूपीआय आयडी
(UPI ID) किंवा मोबाईल क्रमांक देऊ शकता. यानंतर तुम्हाला पेमेंट संदर्भात रिमार्क द्यावा लागेल.
ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमची यूपीआय पिन द्यावा लागेल. पिन दिल्यानंतर तुमचे पैसे संबंधित व्यक्तीला जातील.

 

Web Title :  UPI Payment | payment upi can be done even without internet know complete process

 

हे देखील वाचा :

Home loan संबंधीत 11 गोष्टी ज्या जाणून घेणे आवश्यक, अन्यथा कॅन्सल होऊ शकते लोन अ‍ॅप्लिकेशन

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ED ची लुक आऊट नोटीस; ED ला वाटते देशमुख जातील परदेशात ‘पळून’

Rain in Maharashtra | येत्या 5 दिवसांत मुंबईसह पुण्यात ‘धो-धो’ पाऊस, नंदुरबार वगळता पावसाची राज्यात सर्वदूर बरसणार

 

Related Posts