IMPIMP

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

by omkar
Israel  Prime Minister Benjamin Netanyahu Naphtali Bennett

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन –वृत्त संस्था – इस्त्रायल (Israel) मध्ये 12 वर्षानंतर इस्त्रायल देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Israel  Prime Minister Benjamin Netanyahu) यांना निरोप देण्यात आला आहे. विरोधी नेते आणि आघाडी पक्षांचे उमेदवार नफ्ताली बेनेट यांनी इस्त्रायलचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. नवीन सरकारने शपथ घेतल्यानंतर मागील दोन वर्षात चार वेळा निवडणुका झाल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय संकटावर सुद्धा मार्ग निघाला आहे.

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

नवीन सरकारच्या समर्थनासाठी इस्त्रायलची संसद (Parliament of Israel) ‘नेसेट’मध्ये जोरदार गोंधळ झाला. सत्र सुरूझाल्यानंतर नामांकित पीएम नफ्ताली बेनेट (PM Naftali Bennett) यांना धक्का-बुक्की करण्यात आली. बेनेट यांनी आपले भाषण सुरू करण्याचा प्रयत्न करताच, इतर नेत्यांनी त्यांना वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न केला. भाषणादरम्यान विरोधक बेनेट यांच्यावर ओरडत होते आणि त्यांच्यासाठी गुन्हेगार, खोटारडे अशा शब्दांचा वापर करत होते.

तर, नवीन सरकारमध्ये सहकारी पक्षाचे नेते लॅपिड यांनी तर भाषण अर्धवट सोडून दिले. त्यांनी धक्का-बुक्कीची घटना लोकशाहीसाठी लाजिरवाणी असल्याचे म्हटले.

Ghatkopar Car Video | मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

तिकडे, संसदेत बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की मी इथे लाखो इस्त्रायलींकडून उभा आहे,
ज्यांनी माझ्या नेतृत्वात ङळर्ज्ञीव पक्षाला मत दिले आणि इतर लाखो इस्त्रायलींनी दक्षिणपंथी पक्षांना मत दिले.
नेतन्याहू म्हणतात, आपल्या प्रिय देशासाठी रात्रंदिवस काम करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. बेनेट यांच्या भाषणाच्या उलट नेतन्याहूंच्या भाषणावेळी वातावरण शांत होते.

इस्त्रायलमध्ये एका छोट्या अल्ट्रानॅशनलिस्ट पार्टीचे प्रमुख नफ्ताली बेनेट यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

सत्ताधारी आघाडीत सहभागी 8 छोटे-छोटे पक्ष नेतन्याहू यांना विरोध करणे आणि नव्याने निवडणुका घेण्याच्या विरूद्ध एकत्र आले,
पण हे पक्ष खुपच कमी मुद्द्यांवर आपसात सहमत होते.
तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले नेतन्याहू संसदेत अजूनही सर्वात मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत.

Petrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह इतर प्रमुख शहरांतील 1 लीटरचे दर

Web Title : New power in Israel! Farewell to Israel  Prime Minister Benjamin Netanyahu after 12 years, Naphtali Bennett becomes the new Prime Minister

Related Posts

Leave a Comment