IMPIMP

‘जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान’ ! ‘या’ नेत्याची केंद्र सरकारवर टीका

by pranjalishirish
Mukesh Ambani | ril jio mukesh ambani became first indian whose wealth crossed 100 billion dollar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात अनेकदा विविध कंपन्यांच्या नेटवर्कला रेंज येत नसल्याची तक्रार आपल्याला हमखास ऐकायला मिळते. तसेच आपल्याला त्याचा अनेक वेळा अनुभव देखील येतो. त्यामध्ये बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांची तर अधिक अडचण होते. यावरून मावळ मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत मोबाईल फोनला रेंज येत नसल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. आणि महत्वाचे म्हणजे बाकी कंपन्यांच्या नेटवर्कला रेंज नसली तरी जिओ JIO कंपनीच्या नेटवर्कला फुल्ल रेंज असते. यावरून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

रोहित पवारांनी भाजपला घेरलं !

जेव्हा संसदचे कामकाज सुरु असते तेव्हा संसदेचे कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी सर्वच कंपन्यांच्या मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क बंद करण्यात आले आहे. यासाठी संसद परिसरात जामर बसिवण्यात आला आहे. मात्र, जामर बसवल्यानंतरसुद्धा संसद परिसरात जिओ JIO कंपनीच्या नेटवर्कला रेंज कशी काय येते ? तर एमटीएनएल आणि बीएसएनएल या सरकारी कंपन्यांचे नेटवर्क देशभरातही नीट-नीटके चालत नाही. असा सवाल खासदार बारणे यांनी उपस्थित केला आहे. यावर सभापती महोदया रमा देवी यांनी अध्यक्ष महोदय यासंदर्भात लक्ष देतील, असे सांगितले.

खा. नवनीत राणा अॅक्शन मोडमध्ये, अरविंद सावंत यांच्याविरुद्ध FIR दाखल करणार

तसेच संसद आवारात जिओ JIO कंपनीलाच जामरपासून बाहेर ठेवण्यात आलंय का? असा प्रश्न श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला आहे. श्रीरंग बारणे यांनी ट्विटर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जीओ कंपनीला संसदेत विशेष सुट देण्यात आली असून जीओचे नेटवर्क जामरच्या बाहेर असून केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान असल्याचा आरोपसुद्धा बारणे यांच्याकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात आपण संसदेत प्रश्न उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले आहे असेदेखील बारणे म्हणाले. खेड्या पाड्यातसुद्धा नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे त्यामुळे अनेक गावागावात नेटवर्कची समस्या जाणवत आहे. यामुळे बारणे यांनी थेट संसद सभागृहातच नेटवर्कच्या समस्येचा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच केंद्र सरकारचे जिओ नेटवर्कवर विशेष प्रेम असल्याचे ते म्हणाले.

Also Read :

‘दर महिन्याला राष्ट्रपती राजवटीची मागणी, त्यात नवीन काय’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपला टोला

त्या’ 100 कोटींमध्ये प्रत्येकाचा वाटा?, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- ‘मी आजच केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय’

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

Related Posts