IMPIMP

Vegetarian Protein | ‘या’ 10 शाकाहरी गोष्टींत असतं चिकन लेग पीस इतकं ‘प्रोटीन’, आहारात करा समावेश; जाणून घ्या

by nagesh
vegetarian protein | best vegetarian protein sources that actually are not meat

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Vegetarian Protein | मनुष्याच्या शरीराचा विकास आणि मांसपेशींच्या मजबूतीसाठी प्रोटीन खुप आवश्यक असते. प्रोटीनच्या कमतरतेमुळे आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. काही लोक अंडी किंवा मांस-मासे यांना प्रोटीनचा (Vegetarian Protein) चांगला स्त्रोत मानतात. मात्र अनेक अशा शाकाहारी वस्तू सुद्धा आहेत ज्यामध्ये प्रोटीनची मात्रा अंडे किंवा मीटपेक्षा कमी नाही.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

1 सफेद राजमा –

अर्धा कप सफेद राजमामध्ये सुमारे 10 ग्राम प्रोटीन असते, म्हणजे एका चिकन लेगपीस इतके प्रोटीन असते.

 

 

2 सोयाबीनची शेंग –

अर्धा कप सोयाबीनच्या शेंगांमध्ये सुमारे 9 ग्रॅम प्रोटीन असते.

 

 

3 डाळ –

अर्धा कप डाळीत सुमारे 9 ग्रॅम प्रोटीन असते. तसेच पोटॅशियम, फायबर, फोलेट असते.

 

 

4 भांगचे बी –

तीन चमचे भांगच्या बीमध्ये 10 ग्रॅम प्रोटीनची कमतरता पूर्ण करते. हे सूप, सलाड किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

 

 

5 राजगिरा –

हे ग्लूटेन फ्री धान्य सर्व नऊ आवश्यक अमीनो अ‍ॅसिडसह एक पूर्ण प्रोटीन आहे. एक कप शिजवलेल्या राजगिरामध्ये 9 ग्रॅम प्रोटीन असते.

 

 

6 भोपळ्याचे बी –

एक चतुर्थांश कप भोपळ्याच्या बीयांमध्ये 8 ग्रॅम प्रोटीन असते.

 

 

7 पीनट बटर –

दोन चमचा पीनट बटरमध्ये 8 ग्रॅम प्रोटीन आणि खुप जास्त प्रमाणात हेल्दी फॅट असते.

 

 

 8 ब्लॅक बीन्स –

ब्लॅक बीन्स ज्यास काळा घेवडा म्हटले जाते. अर्धा कप काळ्या घेवड्यात 8 ग्रॅम प्रोटीन असते. यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन-ए, फोलेट आणि कॅल्शियम असते. तसेच, पोटॅशियम, आयर्न आणि मॅग्नेशियम भरपूर असते.

 

 

9 सूर्यफुलाचे बी –

एक मुठपेक्षा सुद्धा कमी सूर्यफुलाच्या बियांमध्ये शरीराला 7 ग्रॅम प्रोटीन मिळते. तुम्ही रोज सकाळी ब्रेकफास्टमध्ये दही किंवा सलाडसोबत सुद्धा खाऊ शकता. यामध्ये प्रोटीनसह अनसॅच्युरेटेड फॅट, कॉपर आणि व्हिटॅमिन-ई सुद्धा असते.

 

 

10 क्विनोआ –

शरीरात प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी क्विनोआचे सेवन करू शकता. एक कप सूकलेल्या क्विनोआ दोन कप पाणी आणि हिरव्या भाज्यांसोबत उकळवा आणि मंद आचेवर 15 मिनिटांपर्यंत शिजवा. एक कप क्विनोआतून शरीरातील 8 ग्रॅम प्रोटीनची कमतरता भरून निघते. हे शरीरात मॅग्नेनिशियम, फॉस्फोरस, मँगेनिज आणि फॉलिक अ‍ॅसिडची कमतरात 20 टक्के पर्यत भरून काढू शकते.

 

Web Title : vegetarian protein | best vegetarian protein sources that actually are not meat

 

हे देखील वाचा :

Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन

Bank Job 2021 | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये SO च्या पदांवर निघाली बंपर भरती, जाणून घ्या कसे करावे अप्लाय

 

Related Posts