IMPIMP

Kolhapur Crime | धक्कादायक ! 17 वर्षीय कॉलेज तरूणीने राहत्या घरात घेतला गळफास; प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | Fed up with harassment a married woman jumps off a terrace and commits suicide Incidents in Katraj area

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना (Kolhapur Crime) समोर आली आहे. येथील कागल तालुक्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन तरूणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. यामुळे कागल (Kagal News) तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित तरूणीने घटनेच्या दिवशी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी तयारी केली. पण ती कॉलेजला गेली नाही. ती आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. प्रीती श्रीकांत आरेकर (Preeti Srikant Arekar) (वय, 17, रा. कसबा सांगाव, ता. कागल) असं आत्महत्या (Suicide in Kolhapur) करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी, घटनेच्या दिवशी सकाळी प्रीतीने कॉलेजला जाण्याची तयारी केली होती. पण ती कॉलेजला गेलीच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या रुममध्ये जाऊन पाहणी केली असता, ती मृतावस्थेत आढळली. तिने राहत्या घरातील पोटमाळ्यावरील लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. आत्महत्येची घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी विजय आरेकर (Vijay Arekar) यांनी कागल पोलीस ठाण्यात (Kagal Police Station) फिर्याद दाखल केली आहे. (Kolhapur Crime)

 

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रीतीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याबाबत माहिती अस्पष्ट आहे. प्राथमिक तपासाच्या आधारे कागल पोलिसांनी (Kagal Police Station) आकस्मिक मृत्यूची (Died) नोंद केली आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

 

Web Title : Kolhapur Crime | 17 years old college student commits suicide in kagal police station area of kolhapur district

 

हे देखील वाचा :

Satara Crime | खळबळजनक ! पैशासाठी तरूणाने वृद्धेला झोपडीसह पेटवून दिलं; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Covid Test | कोरोना रूग्णाच्या संपर्कात येणार्‍यांना टेस्ट करण्याची आवश्यकता नाही, जोपर्यंत जास्त जोखीम नसेल; केंद्राने जारी केली नवीन अ‍ॅडव्हायजरी

EPFO E-Nomination | ई-नॉमिनेशन झाले अनिवार्य, याशिवाय आता पाहता येणार नाही तुमच्या PF खात्याचा बॅलन्स

 

Related Posts