IMPIMP

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरातच सुरु होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेने छापा टाकून दोन तरुणीची केली सुटका (Video)

by sachinsitapure

पिंपरी :  – Pimpri Chinchwad Crime Branch | चिंचवड परिसरातील केशवनगर (Keshav Nagar Chinchwad) येथे सदनिकेत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution Racket) गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाने (Pimpri Chinchwa AHTU) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिला आरोपीला अटक करुन दोन तरुणींची सुटका केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.25) दुपारी चारच्या सुमारास केशवनगर चिंचवड येथील सावंत बिल्डींगमध्ये करण्यात आली.

याबाबत पोलीस हवालदार सुनिल जगन्नाथ शिरसाट (वय-46) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काळेवाडी रोड (Kalewadi Road), केशवनगर चिंचवड येथे राहणाऱ्या महिलेवर 370(3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5,7 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

चिंचवड पोलीस ठाण्याच्या (Chinchwad Police Station) हद्दीतील काळेवाडी रोड येथील सावंत बिल्डींगमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या सदनिकेमध्ये अवैधरित्या मुलींना जास्त पैशाचे आमिष दाखवून (Lure Of Extra Money) वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवून या संपूर्ण प्रकाराची खातरजमा केली आणि या ठिकाणी छापा टाकला.

त्याठिकाणी आरोपी महिला अवैद्यरित्या मुलींना जास्त पैशाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून फ्लॅट मध्ये वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले. आरोपी महिलेच्या ताब्यातून दोन मुलींची सुटका करण्यात आली. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. या कारवाईत 14 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार, सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे, सोनाली माने यांच्या पथकाने केली आहे.

Pune Crime News | पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पत्रकारात हाणामारी, पत्रकारावर FIR

Related Posts