IMPIMP

Kolhapur Crime | हनी ट्रॅपला कंटाळून 32 वर्षीय युवकाची आत्महत्या? सुसाईडपुर्वी चिठ्ठीत लिहिला मोबाईलचा Password

by nagesh
Pune Crime | Earlier a youth was stabbed and six others were remanded in police custody

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन  Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका 32 वर्षीय युवकाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवकाने आत्महत्या करण्याआधी एका चिठ्ठीवर आपल्या मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला आहे. इचलकरंजी येथील सुतार मळा परिसरात ही घटना घडली. नेमकं आत्महत्येचं कारण काय? याबाबत मोबाईल पासवर्डच्या सहाय्याने पोलिसांचा तपास सुरु आहे. हनी ट्रॅपला (Honey trap) कंटाळून युवकाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी (Kolhapur Crime) वर्तवला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, संबंधित युवक मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्याचं आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी बोलणं कमी झालं होतं.
तसेच त्याच्या वागण्यातही फरक पडला होता. यातूनच त्यानं सोमवारी (ता.15) दुपारी आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे.
गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर कुटुंबीयांना देखील धक्का बसला (Kolhapur Crime) आहे.

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून यामध्ये मृत युवकाने आपल्या मोबाइलचा पासवर्ड लिहून ठेवला आहे.
संबंधित युवकाने हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर बदनामी होण्याच्या भीतीनं हे पाऊल उचललं असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलिस (Kolhapur Crime) करीत आहेत.

 

Web Title : Kolhapur Crime | young boy commits suicide in kolhapur write mobile password on note

 

 

हे देखील वाचा :

PM Kisan | पीएम किसान योजनेची रिफंड यादी जाहीर; तुमचे नाव आहे का? चेक करा

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर ! वेतनवाढीबरोबर ‘या’ मोठ्या घोषणा होऊ शकतात, जाणून घ्या

Ration Card | घरबसल्या केवळ एका क्लिकवर तयार होईल रेशनकार्ड, अतिशय सोपी आहे पद्धत; जाणून घ्या

Pune Crime | शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

 

Related Posts