IMPIMP

Ration Card | घरबसल्या केवळ एका क्लिकवर तयार होईल रेशनकार्ड, अतिशय सोपी आहे पद्धत; जाणून घ्या

by nagesh
Ration Card Rule

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  देशात वन नेशन वन कार्ड (One nation one card) ची व्यवस्था लागू झाल्यानंतर लोकांसाठी रेशनकार्ड (Ration card) आणखी आवश्यक झाले आहे. याचा वापर केवळ स्वस्त रेशन घेण्यासाठी नव्हे, तर ओळखपत्र म्हणून सुद्धा केला जातो. ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही राज्याचा व्यक्ती संपूर्ण देशात कुठेही स्वस्त दरात रेशन घेऊ शकतो. यासाठी रेशनकार्ड (Ration Card) असणे आधार (Aadhaar) आणि पॅनकार्ड (PAN) इतकेच महत्वाचे झाले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

जर तुमच्याकडे अजूनपर्यंत रेशनकार्ड नसेल तर घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या स्मार्टफोनद्वारे ऑनलाइन रेशन कार्डसाठी अप्लाय (Apply online for ration card) करून बनवू शकता. यासाठी सर्व राज्यांनी आपल्या वेबसाइट बनवल्या आहेत. तुम्ही ज्या राज्याचे असाल, तेथील वेबसाइटवर जाऊन रेशनकार्डसाठी अर्ज करू शकता.

 

3 प्रकारची असतात रेशनकार्ड (Ration Card)

 

  • गरीबी रेषेच्या वर (एपीएल – APL Ration Card)
  • गरीबी रेषेच्या खाली (बीपीएल – BPL Ration Card)
  • अंत्योदय कुटुंबांसाठी.

 

अंत्योदय कॅटेगरीत अतिशय गरीब लोकांना ठेवले जाते. ही कॅटेगरी व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नावर ठरते. शिवाय, रेशनवर मिळणार्‍या वस्तूंचे प्रमाण वेगवेगळे असते. हे ग्रामीण आणि शहरी दोन्हीसाठी आहे. (Ration Card)

 

पात्रता अटी

 

  1. रेशन कार्ड बनवण्यासाठी व्यक्ती भारताची नागरिक असेण अनिवार्य.
  2. व्यक्तीकडे अन्य राज्याचे रेशन कार्ड नसावे.
  3. ज्याच्या नावावर रेशनकार्ड बनत आहे त्याचे वय 18 पेक्षा जास्त असावे.
  4. अठरा वर्षांच्यापेक्षा कमी वयाच्या मुलांची नावे आई-वडीलांच्या रेशनकार्डमध्ये असतात.
  5. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या नावावर रेशनकार्ड असते.
  6. रेशन कार्डमध्ये ज्या सदस्यांना सहभागी करून घेतले जात आहे, त्यांचे कुटुंब प्रमुखाशी जवळचे नाते असणे आवश्यक आहे.
  7. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे तत्पूर्वी कोणत्याही रेशनकार्डात नाव असू नये.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कसा करावा अर्ज

 

  1. रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. यानंतर अ‍ॅपलाय ऑनलाइन फॉर रेशन कार्ड च्या लिंकवर क्लिक करा.
  3. रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी देता येते..
  4. रेशन कार्डसाठी अर्जाचे शुल्क 5 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा करा आणि अ‍ॅपलिकेशन बसमिट करा.
  5. फील्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुमचा अर्ज योग्य असेल तर तुमचे रेशन कार्ड तयार होईल.

 

या कागदपत्रांची असते आवश्यकता

 

आयडी प्रूफसाठी आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, सरकारी आय कार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देता येईल. याशिवाय पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला पत्त्याचा पुरावा म्हणून विज बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, रेंटल अ‍ॅग्रीमेंट सारखे डॉक्युमेंट सुद्धा लागतील.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

किरकोळ शुल्काची सुद्धा तरतूद

 

रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्जदाराला अतिशय अल्प फि भरावी लागते. दिल्लीत हे शुल्क 5 रुपये ते 45 रुपयांपर्यंत आहे. अ‍ॅप्लीकेशन सबमिट झाल्यानंतर फील्ड व्हेरिफिकेशनसाठी पाठवले जाते. अधिकारी फॉर्ममध्ये भरलेली माहिती तपासात. अर्ज केल्यानंतर 30 दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण होते. सर्व डिटेल व्हेरिफाय झाल्यानंतर रेशन कार्ड बनवले जाते. जर एखादी डिटेल चुकीची असेल तर अर्जदारावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

 

Web Title : Ration Card | ration card apply ration card via smartphone at home check process details here

 

हे देखील वाचा :

Pune Crime | शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Anil Deshmukh | तुरूंगात असलेल्या अनिल देशमुखांना तुर्तास तरी घरचे जेवण नाहीच

MHADA | म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

Nawab Malik | मलिकांचा आणखी एक ट्वीट ‘बाॅम्ब’ ! केपी गोसावीचे WhatsApp चॅट्स समोर, वानखेडेंवरही आरोप

 

Related Posts