IMPIMP

Aaditya Thackeray Twitter Bio | राजकीय भूकंप होणार ? आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन मंत्रीपदाचा उल्लेख हटवला; राजकीय चर्चांना उधाण

by nagesh
Aaditya Thackeray | vedanta foxconn project aaditya thackeray on devendra fadnavis

सरकारसत्ता ऑनलाइन – Aaditya Thackeray Twitter Bio | विधानपरिषदेचा निकाल जाहीर झाला. त्याच रात्री राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारा बंड शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पुकारला. त्यानंतर मंगळवारी सूरतमध्ये घडलेल्या सर्व राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे सह जवळपास 35 – 40 आमदारांना गुवाहाटीला हलवण्यात आले आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत 45 आमदारांचा पाठिंबा असून हे संख्याबळ 50 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसणार असं चित्र असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरुन मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन बायो हटवल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिवसेनेचे युवा नेते आणि आघाडी सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Twitter Bio) यांनी ट्विटरवरुन मंत्रीपदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमधून पर्यावरण मंत्री हा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे याबद्दलच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत.

 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास 35 – 40 आमदार आहेत.
शिवसेना आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे आसामच्या गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी काल ट्विट करुन मी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडला नसल्याचं म्हटलं आहे.
आता आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा उल्लेख हटवला असला तरी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटरवरुन शिवसेनेचा उल्लेख हटवलेला नाही.
दरम्यान महाराष्ट्रात चाललेल्या या राजकीय घडामोडींवर आख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Aaditya Thackeray Twitter Bio | shivsena leader aaditya thackeray removed info of minister form twitter bio maharashtra political crisis

 

हे देखील वाचा :

MLA Devendra Bhuyar | ‘माझ्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे सक्षम आहेत पण…’ – आमदार देवेंद्र भुयार

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल…’ – संजय राऊत

Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

 

Related Posts