IMPIMP

Abhishek Bachchan-Karisma Kapoor Breakup | ‘या’ कारणामुळं मोडला होता अभिषेक आणि करिष्माचा साखरपूडा; अनेक वर्षांनी कारण आलं समोर

by nagesh
Abhishek Bachchan-Karisma Kapoor Breakup | director sunil darshan talk about abhishek bachchan karisma kapoor breakup

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Abhishek Bachchan-Karisma Kapoor Breakup | बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या अफेअरच्या चर्चा आपल्याला काही नवीन नाहीत. सध्या आपण अशाच एका कपलबद्दल बोलणार आहोत. ज्यांची एकेकाळी खूप चर्चा होत होती. ते कपल म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिश्मा कपूर. एक काळ असा होता जेव्हा अभिषेक-करिश्मा बी टाउनचे सर्वात चर्चेत असलेलं कपल होतं. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडत होती. यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा साखरपुडासुद्धा झाला. मात्र यानंतर अशी एक घटना घडली कि दोघांना आपले लग्न मोडावे लागले. त्यावेळी नेमके काय घडले याचे कारण अखेर आज समोर आले आहे. (Abhishek Bachchan-Karisma Kapoor Breakup)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फिल्ममेकर सुनील दर्शन (Director Sunil Darshan) यांनी त्यांच्या एका मुलाखतीत अभिषेक आणि करिश्मा यांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. 2000 सालीच्या सुमारास करिश्मा आणि अभिषेक एकमेकांना 5 वर्ष डेट करत होते. त्यांना लग्नदेखील करायचे होते पण साखरपुड्यानंतर दोघांमधील नाते संपले आणि त्यांचे लग्न मोडले. 2000 साली अभिषेक आणि करिष्मा या दोघांनी सुनील दर्शन यांच्या हा ‘मैंने भी प्यार किया’ सिनेमात काम केलं होतं. सुनील दर्शन पुढे म्हणाले, शुटींगच्या दरम्यान मी दोघांमध्ये इक्वेशनचा अंदाज घेत होतो. पण हा सिनेमा जोरदार आपटला आणि त्यानंतर दोघांचे नातेदेखील संपले. (Abhishek Bachchan-Karisma Kapoor Breakup)

 

सुनील दर्शन पुढे म्हणाले, करिश्मा आणि अभिषेक यांच्या नात्याच्या बातम्या खऱ्या होत्या.
मी स्वत: त्यांच्या साखरपुड्याला गेलो होतो. अभिषेकही खूप स्वीट होता तर करिश्माही फार चांगली आहे.
पण दोघांच्या आयुष्यात लग्नाचा योग नव्हता. चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान हे दोघे सारखे भांडायचे.
ते मेड फॉर इच अदर टाइपचे नव्हते. मला नेहमी वाटायचं की ते एकमेकांसाठीच तयार झालेत पण तसं काही नव्हतं.
एवढेच काय तर त्यांची जोडी जया बच्चन यांनादेखील आवडत होती.
तसेच एका कार्यक्रमात जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी करिश्मा माझी होणारी सून आहे
असं जाहिरही केलं होतं. मात्र पुढे अभिषेक आणि करिष्मा यांचे बिनसले आणि त्यांचे नाते संपुष्टात आले.

 

 

Web Title :- Abhishek Bachchan-Karisma Kapoor Breakup | director sunil darshan talk about abhishek bachchan karisma kapoor breakup

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पर्वती टेकडीवर भर दुपारी युगलाला कोयत्याच्या धाकाने लुबाडले; मित्राच्या डोक्यात कोयत्या मारुन केले जबर जखमी

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेचा अग्निपरीक्षेचा टप्पा उद्यापासून सुरु; प्रियंका गांधी मैदानात

T20 World Cup 2024 | ICC कडून टी-20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल; जाणून घ्या

 

Related Posts