IMPIMP

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 5 हजार रूपयाची लाच घेताना महिला तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption department Jalna: Woman Talathi caught in anti-corruption net while taking bribe of 5 thousand rupees

जालना : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | 68 गुंठे जमीन वारसा हक्क वाटणी पत्रकाप्रमाणे नावावर करून देण्यासाठी 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी (Jalna Bribe Case) करून त्यापैकी 5 हजार रूपये दीड महिन्यांपुर्वी घेवून उर्वरित 5 हजार रूपयाची लाच घेताना महिला तलाठयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Maharashtra) रंगेहाथ पकडले आहे. (ACB Trap News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सविता प्रदीप पाटील Savita Pradeep Patil (30, तलाठी, सजा – शेकटा, अतिरिक्त कार्यभार सजा – करंजगाव, जि. औरंगाबाद) असे लाच घेणार्‍या महिला तलाठयाचे नाव आहे (Jalna ACB Trap). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे आई व वडिलांच्या नावे करंजगाव शिवारात साडेदहा एकर जमीन आहे. त्या जमिनीपैकी 68 गुंठे जमीन वारसा हक्क वाटणी पत्रकाप्रमाणे तक्रारदार यांच्या नावावर करावयाची होती. त्यासाठी महिला तलाठी सविता प्रदीप पाटील यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रूपयाची लाच मागितली. दीड महिन्यांपुर्वी तक्रारदार यांनी त्यांना 5 हजार रूपये दिले. (ACB Trap News)

 

उर्वरित लाच रक्कम 5000 साठी पुन्हा मागणी करण्यात आली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन  विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. सरकारी पंचासमक्ष महिला तलाठी सविता प्रदीप पाटील यांनी  तक्रारदाराकडून 5 हजार रूपयाची लाच घेतली. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. (Jalna Crime News)

 

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (ACB SP Sandeep Atole), अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सुदाम पाचोरकर (DySP Sudam Pachorkar), पोलिस हवालदार गजानन घायवट, पोलिस अंमलदार गणेश बुजाडे, कृष्णा देठे, गणेश चेके,
चालक पोलिस नाईक प्रविण खंदारे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क करावा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  ACB Trap News | Anti-corruption department Jalna: Woman Talathi caught in anti-corruption net while taking bribe of 5 thousand rupees

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply News | कालवे सल्लागार समिती बैठक : पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही, खडकवासला प्रकल्पांतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन 1 मे पासून

NCP Chief Sharad Pawar | बारसू रिफायनरीबाबत शदर पवारांचा राज्य सरकारला सल्ला, म्हणाले-‘कुठलाही प्रकल्प सुरु करताना…’

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 50 हजाराची लाच घेणारा सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Uday Samant | बारसू रिफायनरीसंदर्भात उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर सामंत म्हणाले…

 

Related Posts