IMPIMP

ACB Trap On PSI Jyoti Doke | 8 हजाराच्या लाच प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACB Trap On PSI Jyoti Doke | 8,000 bribe case, Lady police sub-inspector and constable in anti-corruption net

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाईन- ACB Trap On PSI Jyoti Doke | जामिन लवकर मिळण्याकरिता मदत करू तसेच न्यायालयाने म्हणणे
मागितल्यावर लवकर देऊ (IO Say) असे सांगून 8 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून लाच हवालदाराकरवी स्विकारल्याप्रकरणी परिविक्षाधीन
महिला पोलिस उपनिरीक्षक (Lady PSI ACB Trap) आणि हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले आहेत (Ahmednagar
ACB Trap). त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap On PSI Jyoti Doke)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिस उपनिरीक्षक (परिविक्षाधीन) ज्योती मच्छिन्द्र डोके PSI Jyoti Machindra Doke (26, नेमणुक – एमआयडीसी पोलिस स्टेशन, अहमदनगर. मुळ रा. मु.पो. आढळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर. सध्या रा. दुध डेरी चौक, दत्त मंदिराजवळ, वडगाव गुप्ता शिवार, अहमदनगर) आणि पोलिस हवालदार बक्कल नं. 720 संदीप रावसाहेब खेंगट Sandeep Raosaheb Khengat (46, नेमणुक – एमआयडीसी पोलिस स्टेशन, अहमदनगर, रा. मु.पो. बाभुर्डी बेंद, नगर-दौंड रोड, ता.जि. अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत (Ahmednagar Bribe Case). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या मुलाविरूध्द अहमदनगर येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MIDC Police Station Ahmednagar) विनयभंग (Molestation Case) व पोस्को कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल आहेत (Ahmednagar Crime News). दाखल गुन्हयात त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर झाली आहे. त्याला लवकर जामीन मिळण्याकरिता मदत करू व न्यायालयाने म्हणणे मागितल्यावर लवकर देऊ असे सांगुन पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके आणि पोलिस हवालदार संदीप खेंगट यांनी दि. 11 एप्रिल 2023 रोजी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. (ACB Trap On PSI Jyoti Doke)

 

लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दि. 13 एप्रिल 2023 रोजी पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके यांनी सांगितल्याप्रमाणे पोलिस हवालदार संदीप खेंगट यांनी तक्रारदार यांच्याकडून सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेतली. दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नाशिक (Nashik) परीक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Walawalkar), अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे (Addl SP Narayan Nyahalde), पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गायत्री म. जाधव (PI Gayatri M. Jadhav), पोलिस हवालदार चंद्रशेखर मोरे, पोलिस नाईक प्रकाश महाजन आणि पोलिस हवालदार चालक संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  ACB Trap On PSI Jyoti Doke | 8,000 bribe case, Lady police sub-inspector and constable in anti-corruption net

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Devendra Fadnavis | डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Registration and Stamp Duty | दस्तनोंदणीची शासनाची पुनर्विचार याचिका छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळली, दस्तनोंदणी तात्काळ सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

Related Posts