IMPIMP

CM Eknath Shinde | चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

by nagesh
CM Eknath Shinde | Chief Minister Eknath Shinde's directive to provide necessary facilities to the followers coming to Chaityabhoomi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   CM Eknath Shinde | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb
Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी (Chaityabhoomi) येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायींना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याचे निर्देश
मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation (BMC)) प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली.

 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha), खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale), आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar), मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मुंबईसह राज्यात सर्वत्र साजरी होणार आहे. यानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच इंदू मिल (Indu Mill, Mumbai) येथे साकारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही दिले आहेत. जागतिक दर्जाचे स्मारक तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | Chief Minister Eknath Shinde’s directive to provide necessary facilities to the followers coming to Chaityabhoomi

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | डिजिटल तंत्रज्ञान सेवा पुरवठ्यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune Crime News | खडकवासला : पोहण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

Registration and Stamp Duty | दस्तनोंदणीची शासनाची पुनर्विचार याचिका छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळली, दस्तनोंदणी तात्काळ सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune PMC Recruitment | पुणे महानगरपालिका नोकरभरती : दुसर्‍यांदा मुदतवाढ, आतापर्यंत 8774 अर्ज

 

Related Posts