IMPIMP

Adv. Gunaratna Sadavarte | अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ‘ती’ चूक भोवली, वकीलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द

by nagesh
Adv. Gunaratna Sadavarte | gunaratna sadavarte lawyers charter revoked

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांची दोन वर्षांकरीता वकीलीची सनद रद्द (Lawyer’s
Charter Cancelled) करण्यात आली आहे.  अ‍ॅड. सुशील मंचरकर (Adv. Sushil Mancharkar) प्रकरणात सदावर्ते यांची दोन वर्षे वकीलीची सनद
रद्द केली आहे. सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी वकिलाचा ड्रेस परिधान करुन मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. याबाबत
अ‍ॅड  . मंचरकर यांनी दाखल केलेल्या केस प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

 

अ‍ॅड  . गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी सार्वजनिक ठिकाणी गाऊन घालण्याच्या कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होते,
असे म्हणत मंचरकर यांनी सदावर्ते यांच्या विरोधात शिस्त पालन याचिका (Disciplinary Petition) दाखल केली होती. याबाबत बार कौन्सिलच्या (Bar
Council) तीन सदस्यीय समितीने निकाल देताना सदावर्ते यांची वकिलीची सदन दोन वर्षांसाठी रद्द केली आहे. हा सदावर्ते यांना मोठा धक्का मानला
जात आहे. बार कौन्सिलच्या या निर्णयामुळे सदावर्ते यांना पुढील दोन वर्षे वकिली करता येणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

मंचरकर म्हणाले, 2022 मध्ये सदावर्ते यांच्या विरोधात बार कौन्सिलमध्ये तक्रार केली होती. नियम सात नुसार वकीलांनी सार्वजनिक ठिकाणी बँड किंवा गाऊन घालणे प्रतिबंध केले आहे. नियम सात मध्ये असा नियम असताना आझाद मैदानावर (Azad Maidan) त्यावेळी सुरु असलेल्या आंदोलनात गाऊन आणि बँड घालून आदोलनस्थळी उपस्थित राहत, डान्स केला होता. त्यामुळे वकिलांची प्रतिमा डागाळली होती. यावरुन मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

 

Web Title : Adv. Gunaratna Sadavarte | gunaratna sadavarte lawyers charter revoked

 

हे देखील वाचा :

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस्, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

Pune Accident News | कामावरुन घराकडे परतणाऱ्या 8 शेतमजूरांना भरधाव पिकअपने चिरडले, 2 चिमुकल्यांसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना

Chandrakant Patil On Pune Kasba Bypoll Election | कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच – चंद्रकांत पाटील

Pune Lingana Fort | पुण्यातील लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंग करताना हार्ट अटॅक, 62 वर्षीय ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू

 

Related Posts