IMPIMP

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस्, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

by nagesh
S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak' Championship T20 Cricket Tournament; Nutrilicious, Hemant Patil Cricket Academy Teams' Victory Salute !!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ (S. Balan Cup T20 League) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत न्युट्रीलिशियस् आणि हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी (Hemant Patil Cricket
Academy) या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. (S. Balan Cup T20 League)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर (Shinde High School Ground, Sahakarnagar) सुरू असलेल्या या स्पर्धेत आदित्य लोंढे याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर न्युट्रीलिशियस् संघाने अष्टपैलू स्पोर्ट्स फाऊंडेशन संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि शानदार सुरूवात केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना अष्टपैलू स्पोर्ट्स फाऊंडेशनने ११७ धावा धावफलकावर लावल्या. अमन मुल्ला (२७ धावा), पवन आनंद (नाबाद २२ धावा) आणि सोहम सरवदे (२० धावा) यांनी धावांचे योगदान दिले. आदित्य लोंढे (२-३२) आणि वैभव विभूते (२-२१) यांच्या अचूक गोलंदाजीसमोर अष्टपैलू संघाच्या धावसंख्येला वेसण लागले. हे आव्हान न्युट्रीलिशियस् संघाने १५.२ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. योगेश ताकवले (नाबाद ४७ धावा) आणि आदित्य लोंढे (नाबाद ३४ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

 

दिव्यांग हिंगणेकर याच्या कामगिरीच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने वालेकर स्पोर्ट्स संघाचा १० गडी राखून एकतर्फी पराभव केला. हेमंत पाटील संघाच्या गोलंदाजांच्या अचूक मार्‍यासमोर वालेकर स्पोर्ट्सचा डाव ७३ धावांवर गडगडला. संदीप शिंदे (३-१८) आणि दिव्यांग हिंगणेकर (२-६) यांच्या गोलंदाजींच्यासमोर वालेकर संघाच्या डावाला खिंडार पडले. स्वप्निल फुलपगार (नाबाद ३९ धावा) आणि दिव्यांग हिंगणेकर (नाबाद ३० धावा) यांच्या फलंदाजीमुळे हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ८ षटकात हे आव्हान सहज पूर्ण केले. (S. Balan Cup T20 League)

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
अष्टपैलू स्पोर्ट्स फाऊंडेशनः २० षटकात ९ गडी बाद ११७ धावा (अमन मुल्ला २७, पवन आनंद नाबाद २२, सोहम सरवदे २०, आदित्य लोंढे २-३२, वैभव विभूते २-२१) पराभूत वि. न्युट्रीलिशियस्ः १५.२ षटकात ३ गडी बाद ११९ धावा (योगेश ताकवले नाबाद ४७ (३८, ५ चौकार, १ षटकार), आदित्य लोंढे नाबाद ३४, हृषीकेश राऊत २१, पवन आनंद ३-१८); सामनावीरः आदित्य लोढें;

 

वालेकर स्पोर्ट्सः १९.२ षटकात १० गडी बाद ७३ धावा (संदीप मोर्य १४, शुभम खटाळे नाबाद १३, संदीप शिंदे ३-१८, दिव्यांग हिंगणेकर २-६) पराभूत वि. हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ८ षटकात बिनबाद ७३ धावा (स्वप्निल फुलपगार नाबाद ३९, दिव्यांग हिंगणेकर नाबाद ३०); सामनावीरः दिव्यांग हिंगणेकर;

 

Web Title : S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket Tournament; Nutrilicious, Hemant Patil Cricket Academy Teams’ Victory Salute !!

 

हे देखील वाचा :

Pune Accident News | कामावरुन घराकडे परतणाऱ्या 8 शेतमजूरांना भरधाव पिकअपने चिरडले, 2 चिमुकल्यांसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना

Chandrakant Patil On Pune Kasba Bypoll Election | कसब्याचा पराभव हा पराभव नाही… आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच – चंद्रकांत पाटील

Pune Lingana Fort | पुण्यातील लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंग करताना हार्ट अटॅक, 62 वर्षीय ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Minister Tanaji Sawant | महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस अन् माझ्यात 150 बैठका; तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

 

Related Posts