IMPIMP

Ahmednagar ACB Trap | अहमदनगर अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – 36 हजाराची लाच घेताना तलाठी, टायपिस्ट एसीबीच्या जाळयात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption department: A female junior assistant and a teacher in the net of anti-corruption in the case of bribe of 16 thousand

अहमदनगर :सरकारसत्ता ऑनलाईन  – Ahmednagar ACB Trap | 40 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती 36 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी तलाठी आणि टायपिस्ट (Talathi and Typist) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Nashik) जाळयात अडकले आहेत. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahmednagar ACB Trap)

 

धनराज नरसिंग राठोड Dhanraj Narsing Rathod (40, व्यवसाय – तलाठी, सजा – चिखली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर. रा. शेळके हॉस्पीटलच्या बाजूला, इंदिरानगर गल्ली नं. 1, ता. संगमनेर) आणि योगेश विठ्ठल काशीद Yogesh Vittal Kashid (33, व्यवसाय – टायपिंग, सह्याद्री मल्टी सर्व्हिसेस. रा. घुलेवाडी फाटा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडिल व इतर 11 जणांच्या नावे मंगळापुर येथे असलेले बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्याच्या मोबदल्यात तलाठी धनराज नरसिंग राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली (Ahmednagar Bribe Case). तडजोडीअंती 36 हजार रूपयाची लाच घेण्याचे मान्य केले. (Ahmednagar ACB Trap)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, तलाठी धनराज राठोड यांच्या सांगण्यावरून टायपिस्ट योगेश विठ्ठल काशीद याने दि. 21 एप्रिल 2023 रोजी सरकारी पंचासमक्ष 36 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तलाठी राठोड आणि टायपिस्ट काशीद यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahmednagar Crime News)

 

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Walawalkar), अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे (Addl SP Narayan Nyahalde), पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गायत्री म. जाधव (PI Gayatri M. Jadhav), पोलिस हवालदार सचिन गोसावी, पोलिस नाईक अजय गरूड आणि चालक पोलिस हवालदार विनोद पवार यांच्या पथकाने ही कारवई केली आहे.

 

 

Web Title : Ahmednagar ACB Trap | Ahmednagar Anti-Corruption Bureau: Anti-Corruption Division – Talathi, typist caught in ACB’s net while accepting bribe of 36,000

 

हे देखील वाचा :

Nashik ACB Trap | नाशिक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – 50 हजाराची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी एसीबीच्या जाळयात

Jaykar Library Pune University | विद्यापीठाच्या अनेक पिढ्या घडविणारे जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र ! जागतिक पुस्तक दिन विशेष : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र

SD Films Production | एस. डी. फिल्म्स प्रॉडक्शन हाऊसचे मान्यवरांच्या उपस्थितीत लाँचिंग

Maharashtra Govt News | सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

Related Posts