IMPIMP

Nashik ACB Trap | नाशिक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – 50 हजाराची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी एसीबीच्या जाळयात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption department Jalna: Woman Talathi caught in anti-corruption net while taking bribe of 5 thousand rupees

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन   – Nashik ACB Trap | 4 लाखाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 2 लाख रूपयाची लाच घेण्याचे मान्य केल्यानंतर त्यापैकी 50 हजार रूपयाचा पहिला हप्ता घेताना तालुका कृषी अधिकार्‍याला (Taluka Agriculture Officer) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Nashik ACB Trap) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे. (Nashik Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अण्णासाहेब हेमंत गागरे Annasaheb Hemant Gagare (42, सिन्नर कृषी अधिकारी – Sinnar Agriculture Officer, अतिरिक्त कार्यभार निफाड – Niphad, जि. नाशिक. रा. प्राइड ग्लोरी अपार्टमेंट, नाशिक रोड – Nashik Road) असे लाच घेणार्‍या कृषी अधिकार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे सिन्नर एमआयडीसीमध्ये (Sinnar MIDC) शेती यंत्रे व अवजारांचे उत्पादन करतात. त्यांनी उत्पादिक केलेल्या यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर शेतकर्‍यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरित करण्यात येत असते. परंतु कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांनी तक्रारदाराकडून उत्पादित केलेली यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे भासवुन तक्रारदार यांना त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रणावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता 4 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली (Nashik Bribe Case). तडजोडीअंती 2 लाख रूपयाची लाच घेण्याचे कृषी अधिकारी अण्णाासाहेब गागरे यांनी मान्य केले. (Nashik ACB Trap)

 

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तात्काळ अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दि. 21 एप्रिल 2023 रोजी कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांनी तक्रारदाराकडून सरकारी पंचासमक्ष लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50 हजार रूपये घेतले. त्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

 

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Walawalkar), अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे (Addl SP Narayan Nyahalde), पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक अभिषेक पाटील (DySP Abhishek Patil), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे, पोलिस नाईक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Nashik ACB Trap | Nashik Anti-Corruption Bureau: Anti-Corruption Division – Taluka Agriculture Officer caught in ACB’s net while taking bribe of 50,000

 

हे देखील वाचा :

Jaykar Library Pune University | विद्यापीठाच्या अनेक पिढ्या घडविणारे जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र ! जागतिक पुस्तक दिन विशेष : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र

SD Films Production | एस. डी. फिल्म्स प्रॉडक्शन हाऊसचे मान्यवरांच्या उपस्थितीत लाँचिंग

Maharashtra Govt News | सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे पोलिस स्टेशन – पुणे पोलिसांकडून तडीपार गुंडाला अटक

 

Related Posts