IMPIMP

Maharashtra Govt News | सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

by nagesh
Maharashtra Govt News | Calling for applications for the post of Assistant Hostel Warden

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Govt News | सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहायक वसतिगृह अधिक्षिका पद भरावयाचे आहे. इच्छुक महिलांनी सांताक्रुझ येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. (Maharashtra Govt News)

 

सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई येथे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय सहा. वसतिगृह अधिक्षिका म्हणून नेमणूक करावयाची आहे. (पद संख्या – 01) या पदासाठी अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मुत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक/आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य) तसेच, त्यांचे शिक्षण – दहावी उत्तीर्ण असावे. एमएससीआयटी पास व टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. यासाठी वयोमर्यादा – 30 ते ५० वर्षे असावी. मानधन रू. २३,२८३/- दरमहा असून, यासाठीची मुलाखत २५ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्जासोबत युद्ध विधवा/ विधवा/ माजी सैनिक/ आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र व शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात. (Maharashtra Govt News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अधिक माहितीसाठी ०२२-३५०८ ३७१७, २२७९३३३५. या क्रमांकावर किंवा ईमेल [email protected] वर संपर्क करावा.

 

 

Web Title : Maharashtra Govt News | Calling for applications for the post of Assistant Hostel Warden

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे पोलिस स्टेशन – पुणे पोलिसांकडून तडीपार गुंडाला अटक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : दत्तवाडी पोलिस स्टेशन – भावाने घेतलेले पैसे परत न केल्याने आईवडिलांचे केले अपहरण ! भाऊ झाला फरार, बहिण, पतीला ठेवले डांबून

Dagdusheth Ganpati | ‘दगडूशेठ’ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य; ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये होणार आंब्याच्या प्रसादाचे वाटप (Video)

 

Related Posts