IMPIMP

Ahmednagar Crime | धक्कादायक ! शिर्डी संस्थान पुन्हा एकदा अधिकार्‍यामुळं चर्चेत; नराधमानं पाठवले महिला साईभक्तांना अश्लिल व्हिडीओ अन् मेसेज

by nagesh
Ahmednagar Crime | shirdi sai baba sansthan official of public relations department obscene messages female devotees

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Ahmednagar Crime | शिर्डी साईबाबा संस्थानच्या (shirdi sai baba mandir) एका जनसंपर्क विभागातल्या अधिकाऱ्यानं काही महिला भक्तांना (female devotees) मोबाईलवरुन अश्लील मेसेज पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणावरुन तक्रार (Ahmednagar Crime) दाखल करण्यात आली आहे. तर संबधित महिलांनी आसाम आणि मुंबईतल्या संस्थानकडे याबाबत तक्रार केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार असून शिर्डी संस्थान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

 

संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातील एका अधिकार्‍याने मुंबई आणि आसाममध्ये (Mumbai and Assam) असलेल्या साईभक्त महिलांशी सुरुवातीला
काही कारणांतून जवळीक साधली. त्यानंतर त्या महिला साईभक्तांना मोबाईलवरुन अश्लील व्हिडिओ पाठवले आहे. संबंधित महिलांनी शिर्डीच्या
साईबाबा संस्थानकडे याबाबत तक्रार (Ahmednagar Crime) केली आहे. तसेच, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (CEO
Bhagyashree Banayat) यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अशी मागणी शिवसेनेच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी केलीय.
याबाबत शिवसेना महिला आघाडीच्या राहाता तालुका संघटक स्वाती सुनील परदेशी (Swati Sunil Pardeshi) यांनी निवेदन दिलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दरम्यान, संबंधित महिलांच्या लेखी तक्रारीची दखल घेण्यात यावी. आंतरराष्ट्रीय ख्यातीचं असं साईबाबा संस्थान आहे. त्यामुळे अशा ठिकाणी असे विचित्र प्रकार घडू नयेत. आपण एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अशा महिला अधिकारी आहात. त्यामुळे आपल्याकडून महिला भक्तांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या गंभीर प्रकरणात आपण लक्ष घालून संबंधितांची चौकशी करून योग्य ती कडक कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात (Ahmednagar Crime) केली आहे.

 

Web Title :- Ahmednagar Crime | shirdi sai baba sansthan official of public relations department obscene messages female devotees

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar Banner In Pune | ‘जत्रेत खेळणार्‍यांनी तालमीत खेळणार्‍या पैलवानाचा नाद करू नये’, पुण्यात अजित पवारांच्या त्या बॅनरची चर्चा, अन्…(व्हिडीओ)

Dr. Amol Kolhe In PCMC | खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘एन्ट्री’नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक ‘अ‍ॅक्शन’मध्ये

Pune News | पुण्यातील तरूणाचा आनोखा प्रयोग | चक्क नाण्यांपासून बनवले आकर्षक ‘शिवलिंग’

 

Related Posts